---Advertisement---

लिसेस्टरशायरकडून टीम इंडियाचे जंगी स्वागत, सराव सामन्यापूर्वी असे काही करत जिंकली भारतीयांची मने

On: गुरूवार, जून 23, 2022 4:51 PM
Indian-Team-Welcome
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना १ जुलैपासून खेळला जाणार आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असलेला हा सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघ लिसेस्टरशायर संघाविरुद्ध ४ दिवसीय सराव सामना खेळत आहे. लिसेस्टर येथे गुरुवारपासून (२३ जून) या सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यापूर्वी लिसेस्टरशायर क्रिकेट संघाकडून उभय संघातील खेळाडूंचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रथम फलंदाजी निवडली. त्यानंतर जेव्हा सामन्याला सुरुवात झाली, तेव्हा पंच आणि खेळाडू मैदानात येत असताना हा छोटासा स्वागत समारंभ (Team India’s Welcome) आयोजण्यात आला.

व्हिडिओत दिसते की, काही व्यक्ती हातात ढोल घेऊन उभे आहेत आणि ते पंच, लिसेस्टरशायर आणि भारतीय संघाचे खेळाडू मैदानात जात असताना ढोल वाजवत आहेत. त्यांच्या संगतीला काही घागरा व पंजाबी पोषाख परिधान केलेले स्त्री आणि पुरुष ढोलच्या तालावर ठेका घेताना दिसत आहेत. याचवेळी काही मुले भारतीय संघाचा आणि लिसेस्टरशायर संघाचा झेंडा हाती घेऊन उभे असलेलेही दिसत आहेत. लिसेस्टरशायर संघाकडून भारतीय खेळाडूंचे हिंदू संस्कृतीनुसार करण्यात आलेले हे स्वागत चाहत्यांच्या मनाला भिडले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सराव सामन्यासाठी असे आहेत संघ-

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव

लिसेस्टरशायर सीसीसी: सॅम इवांस (कर्णधार), रेहान अहमद, सॅम बेट्स (यष्टीरक्षक), नेट बॉली, विल डेविस, जॉय एविसन, लुइस किम्बर, अबी सकांडे, रोमन वॉकर, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘द्रविडसोबत वेळ घालवणे विराटला फायद्याचे ठरेल’, कोहलीच्या प्रशिक्षकांनी सांगितले कारण

आयर्लंडविरुद्ध खेळणारा तिसरा कर्णधार असेल हार्दिक पंड्या, मागील दौऱ्यात अशी राहिलीय कामगिरी

अरेरे! फक्त एका धावेने हुकले डेविड वॉर्नरचे शतक, ९९ वर यष्टीचीत होत लाजिरवाणा विक्रमही नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---