मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना शनिवार (२६ डिसेंबर) पासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व सांभाळत आहे. दरम्यान या सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याने त्याच्या एका कृत्याने सर्वांची मने जिंकली आहेत.
त्याचे झाले असे की भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी दमदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्यातही या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेत शानदार कामगिरी बजावली. त्याने पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लॅब्यूशेनला ४८ धावांवर बाद करत कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. लॅब्यूशेनचा झेल शुबमन गिलने घेतला. विशेष म्हणजे गिलही या सामन्यातून कसोटी पदार्पण करत आहे.
सिराजने लॅब्यूशेनला बाद करत भारताच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर केला. त्यामुळे जेव्हा दुसरे सत्र संपले, तेव्हा रहाणेने ड्रेसिंग रुममध्ये परतताना सिराजला भारतीय संघाला लीड करण्यास सांगितले, म्हणजेच सर्वात पुढे सिराजला जायला सांगत त्याने केलेल्या कामगिरीचा एकप्रकारे सन्मानच केला.
याआधीही रहाणेने दाखवली होती खिलाडूवृत्ती –
विशेष म्हणजे संघाचे नेतृत्व करताना खिलाडूवृत्ती दाखवण्याची रहाणेची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जेव्हा अफगाणिस्तान संघ त्यांचा पहिला कसोटी सामना भारतात खेळायला आला होता, तेव्हा देखील रहाणे भारताचा प्रभारी कर्णधार होता. तसेच त्यावेळी भारताने सामना जिंकल्यानंतरही त्याने अफगाणिस्तानच्या संघाला विजेत्यांचा फोटो काढण्यावेळी बरोबर घेतले होते.
What a brilliant gesture from #TeamIndia to ask @ACBofficials players to pose with them with the Trophy. This has been more than just another Test match #SpiritofCricket #TheHistoricFirst #INDvAFG @Paytm pic.twitter.com/TxyEGVBOU8
— BCCI (@BCCI) June 15, 2018
2018: inviting Afghanistan for the victory photo.
2020: letting the debutant Mohammad Siraj to lead the team after getting his maiden Test wicket.
Ajinkya Rahane the captain is full of gestures. ❤️ pic.twitter.com/TsH0O9Wwee
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2020
तिसऱ्या सत्रातही सिराजची कमाल –
सध्या मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या सत्रात कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट मिळाल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या सिराजने तिसऱ्या सत्रातही शानदार प्रदर्शन केले. त्याने तिसऱ्या सत्रात कॅमेरॉन ग्रीनला बाद केले तसेच मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचे झेलही घेतले.
आर अश्विनकडून मिळाली पदार्पणाची कॅप –
सिराजला त्याच्या कसोटी पदार्पणाची कॅप आर अश्विनच्या हातून मिळाली. त्यामुळे तो भारताकडून कसोटी खेळणारा २९८ वा खेळाडू ठरला. सिराजने देशांतर्गत क्रिकेटपासून ते अ दर्जाच्या भारतीय संघापर्यंत पोहोचताना अनेक कठीण अडथळ्यांचा सामना केला आहे. त्यानंतर त्याने भारतीय संघाकडून खेळण्याचा हक्क मिळवला आहे, अशा शब्दात अश्विनने कॅप देताना सिराजची प्रशंसा केली.
बीसीसीआयने केला सिराजच्या हिम्मतीला सलाम
एवढेच नव्हे तर, सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच त्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. तरीही त्याने कुटुंबापेक्षा जास्त आपल्या कर्तव्याला महत्त्व दिले. त्याच्या या हिम्मतीची दाद देत बीसीसीआयनेही त्याला सलाम केला. “त्याने वैयक्तिक शोकांतिकेचा सामना केला, प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि आता त्याला २९८वा भारतीय कसोटीपटू म्हणून नावाजण्यात येत आहे,” असे ट्विट बीसीसीआयने केले आहे.
He battled personal tragedy, fought adversity and is now rewarded with India's Test ???? no. 298. Congratulations Mohammed Siraj. Go seize the day! #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/D48TUJ4txp
— BCCI (@BCCI) December 25, 2020
सिराजने कसोटी पदार्पण करण्याआधी १ वनडे आणि ३ टी२० सामने आंरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. यात त्याने एकूण ३ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IND vs AUS: पदार्पणातच सिराजची हवा; लॅब्यूशानेनंतर ‘या’ ऑसी फलंदाजाला धाडलं तंबूत
पदार्पण वीरांची चपळाई कांगारूंवर पडली भारी, सिराज-गिल जोडीच्या ‘त्या’ एका विकेटने ऑसींचा डाव गडगडला
मेहनत फळाला आली..! सिराजला टेस्ट कॅप देत आर अश्विनने थोपटली पाठ, पाहा व्हिडिओ




