ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिग बॅश लीग १० मध्ये दररोज काही-ना-काही घटना घडत असतात, ज्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मग एखाद्या फलंदाजाने मारलेला जबरा षटकार असो वा एखाद्या खेळाडूने पकडलेला भन्नाट झेल असो. बऱ्याचदा खेळाडूंनी दाखवलेली खिलाडू वृत्ती, पंचांशी मैदानावर शिवीगाळ करणे अशाही घटना घडल्याच्या पाहायला मिळाल्या आहेत. अशात नुकताच एका खेळाडूने अजब गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. रविवारी (३१ जानेवारी) सिडनी थंडर विरुद्ध ब्रिस्बेन हिट संघात झालेल्या बादफेरी सामन्यातील हा व्हिडिओ आहे.
झाले असे की, सिडनी थंडर संघाचा डाव चालू होता. यादरम्यान ब्रिस्बेन हिट संघाचा गोलंदाज लेविस ग्रेगरी याने एक अजब चेंडू टाकला. ग्रेगरीने टाकलेला तो चेंडू खेळपट्टीवर टप्पा न खाता फलंदाजाच्या डोक्यावरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेला. हे पाहून गडबडून स्वत: फलंदाजदेखील चेंडू शोधू लागला. त्यानंतर स्वत: ग्रेगरीदेखील आपल्या विचित्र चेंडूला पाहून हसू लागला. त्याच्या या आगळ्या-वेगळ्या गोलंदाजीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
Oh boy 🤪
Lewis Gregory has let go of that one. Bucket Ball free-hit comin' right up!@KFCAustralia | #BBL10 pic.twitter.com/ZfykQBzEMb
— KFC Big Bash League (@BBL) January 31, 2021
ब्रिस्बेन हिटचा ७ विकेट्सने थरारक विजय
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडर संघाने निर्धारित २० षटकात १५८ धावा केल्या. यात यात सॅम बिलिंग्स आणि बेन कटिंग यांच्या सर्वाधिक ३४ धावांचे योगदान होते. प्रत्युत्तरात ब्रिस्बेन हिटचा सॅम हिज्लेट याच्या नाबाद ७४ धावांच्या आतिशी खेळीने ५ चेंडू राखून सहज आव्हान पूर्ण केले. सॅम हिज्लेटसोबत जिम्मी पर्सन यानेही संघाच्या विजयात नाबाद ४३ धावांचे योगदान दिले.
यानंतप पुढील बादफेरी सामना सोमवारी (१ फेब्रुवारी) होणार आहे. पर्थ स्कॉर्चर्स विरुद्ध ब्रिस्बेन हिट संघात हा सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट-अनुष्काच्या लाडक्या लेकीचे नाव ठरलं! बाळासह फोटो पोस्ट करत दिली माहिती
कोलकाता ते कानपुर व्हाया मद्रास, तब्बल ३६ वर्षांपासून कायम आहे अझरुद्दीन यांचा ‘हा’ विश्वविक्रम
सिंधुदुर्ग ते लंडन व्हाया मुंबई असा प्रवास करणारी पूनम राऊत