आयपीएल 2025 च्या तेराव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले. लखनऊ संघाला हा सामना जिंकता आला नसला तरी, क्षेत्ररक्षणादरम्यान संघातील दोन खेळाडूंमधील समन्वयाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने घरच्या मैदानावर 20 षटकांत 7 गडी गमावून 171 धावा केल्या. यानंतर, जेव्हा पंजाबचा डाव सुरू झाला, तेव्हा लखनऊ सुपर जायंट्सचे दोन युवा खेळाडू आयुष बदोनी आणि रवी बिश्नोई यांनी क्षेत्ररक्षणात चमत्कार केले. दोघांनी मिळून एक अविश्वसनीय झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयुष बदोनी आणि रवी बिश्नोई यांच्यातील क्षेत्ररक्षणातील उत्कृष्ट समन्वयाचा हा अद्भुत देखावा पंजाबच्या डावाच्या 11व्या षटकात पाहायला मिळाला. या षटकात दिग्वेश राठी गोलंदाजी करायला आला. प्रभसिमरन सिंगने षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्लॉग स्वीप केला. बॅटला लागल्यानंतर चेंडू डीप मिड-विकेटकडे खूप उंच गेला. तिथे उभ्या असलेल्या आयुष बदोनीने झेल घेण्याचा प्रयत्न केला पण तोल गेल्यामुळे तो सीमा ओलांडू लागला. मग, उत्तम बुद्धिमत्ता दाखवत, त्याने चेंडू हवेत मैदानाच्या दिशेने फेकला. डीप स्क्वेअर लेगवरून येत असलेल्या बिश्नोईने डावीकडे डायव्ह केले आणि एक आकर्षक कॅच घेतला. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. क्षणभर मैदानावर काय घडले हे कोणालाही समजले नाही. आता हा कॅच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ-
Superb. Smart. Special 🤝
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2025
A brilliant tag-team effort from Ayush Badoni & Ravi Bishnoi helped #LSG get the crucial wicket of Prabhsimran Singh! 👏#TATAIPL | #LSGvPBKS | @LucknowIPL pic.twitter.com/PxXxEwvX5G