मार्च महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी लियाम लिविंगस्टोन याला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली.
इंग्लंडच्या या फलंदाजाला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स शर्यतीत होते. पुढे नव्या गुजरात जायंट्स संघानेही उडी घेतली. परिणामी १ कोटींच्या मूळ किंमतीसह उतरलेला हा खेळाडू तब्बल १० कोटींच्या पार गेला. अखेर ११ कोटी ५० लाखांना पंजाब किंग्जने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे. यानंतर आता पंजाब किंग्जच्या पर्समध्ये १७ कोटी १५ लाख रूपये शिल्लक आहेत.
.@liaml4893 is SOLD to @PunjabKingsIPL for INR 11.50 crore 💰💰🔥#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
लिविंगस्टोनने गतवर्षी राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला केवळ ७५ लाखांना विकत घेतले होते. त्यामुळे यंदा त्याला चक्क कोटींमध्ये बोली लागणे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ९ सामने खेळताना ११२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Auction | रेकॉर्डब्रेक बोली घेत ‘लियाम लिविंगस्टोन’चा पंजाबच्या ताफ्यात दिमाखात प्रवेश!
एडन मार्करमचा लिलावातही पराक्रम! हैद्राबादने विश्वास दाखवत लगावली भली मोठी बोली
मंकडींग आऊट झालेल्या बटलरकडूनच अश्विनचं राजस्थानमध्ये स्वागत, म्हणाला, ‘काळजी नको, मी क्रिजमध्येच