---Advertisement---

आई शप्पथ! इंग्लंडच्या ‘या’ शतकवीराने ठोकला १२२ मीटरचा गगनचुंबी षटकार, सर्वत्र रंगली एकच चर्चा

On: सोमवार, जुलै 19, 2021 11:28 AM
---Advertisement---

वनडे मालिकेत पाहुण्या इंग्लंडने पाकिस्तानचा ३-० ने धुव्वा उडवल्यानंतर उभय संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना रविवारी (१८ जुलै) पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. या दरम्यान इंग्लंडच्या एका फलंदाजाने अप्रतिम गगनचुंबी षटकार लगावला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात २०० धावा केल्या होत्या. इंग्लंड संघाकडून जोस बटलरने ३९ चेंडूत सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली होती. तसेच मोईन अलीने अवघ्या १६ चेंडुंमध्ये ३६ धावांची खेळी केली. (Liam Livingstone smashed a 122 meter six against Pakistan in second T20 match)

लिविंगस्टोनचा गगनचुंबी षटकार
तसेच लियाम लिविंगस्टोनने २३ चेंडुंमध्ये ३८ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार लगावले होते. यातील एक षटकार इतका आकर्षक होता की, समालोचक आणि प्रेक्षकांसह गोलंदाज देखील आश्चर्यचकित झाला होता.

तर झाले असे की, १६ वे षटक टाकण्यासाठी हारीस रउफ गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर लियाम लिविंगस्टोनने १२२ मीटरचा षटकार लगावला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच क्रिकेट चाहते या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील देत आहेत.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1416786299135037444?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1416786299135037444%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fliam-livingstone-smashed-a-122-meter-six-against-pakistan-in-2nd-t20i-match-watch-video-hindi-2489420

लियाम लिविंगस्टोनने पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. त्याने ४३ चेंडुंचा सामना करत ६ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली होती.

दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात २०० धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला ९ गडी बाद १५५ धावा करण्यात यश आले होते. हा सामना इंग्लंड संघाने ४५ धावांनी आपल्या नावावर केला. तसेच ही मालिका १-१ ने बरोबरीत आली आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक टी-२० सामना मंगळवारी (२० जुलै) खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अय्योव! कोलंबो वनडेदरम्यान अचानक मैदानात आला पतंग, पुढे काय घडले एकदा पाहाच

मिड ऑनवर धवनचा सुपर झेल, मग गब्बर स्टाईल सेलिब्रेशनही; हा शानदार क्षण तुम्ही पाहिलाय ना?

पहिल्याच वनडेत श्रीलंकेची हारकिरी, नवनियुक्त कर्णधाराने सांगितलं कुठे झाली चूक?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---