भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रिषभ, एमएस धोनीला आपला आदर्श मानतो. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर रिषभने वनडे, कसोटी आणि टी -२० क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. संघात वरिष्ठ यष्टीरक्षक फलंदाज असताना देखील रिषभ पंतला संघात स्थान दिले जाते. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रिषभ पंत कोट्यवधी झाला आहे.
इंडियन प्रीमिअर लीग २०२१ स्पर्धेत, दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या रिषभला २०१९ च्या फोर्ब्सच्या यादीत ३० वे स्थान देण्यात आले होते. त्याने २०२० मध्ये तब्बल २९.१९ कोटींची कमाई केली होती. तसेच २०२१ मध्ये रिषभ पंतची एकूण संपत्ती, ३६ कोटी रुपये इतकी आहे. त्याची वार्षिक कमाई १० कोटी रुपये इतकी आहे. तर महिन्याला त्याला ३० लाख रुपये मिळतात.
रिषभ पंतची गेल्या काही वर्षांतील उल्लेखनीय कामगिरी पाहता, त्याला करारबद्ध खेळाडूंच्या यादीत ‘ए’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. यानुसार त्याला वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात. प्रत्येक कसोटी सामन्याचे त्याला ३ लाख, वनडे सामन्याचे २ लाख आणि टी२० सामना खेळायचे त्याला १.५ लाख रुपये मिळतात. या व्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स संघाकडून त्याला प्रत्येक हंगामात ८ कोटी रुपये मिळतात.
https://www.instagram.com/p/CDbHcF1DnZI/
या ब्रँड्स सोबत करतो काम
रिषभ पंत अनेक जाहिरातींमध्ये झळकत असतो. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात पंतच्या कमाई मध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण जाहिराती आहेत. तो एसजी, ॲडिडास यांसारख्या बड्या कंपन्यांसोबत जोडला गेला आहे. गतवर्षी रिषभ पंतने जेएसडब्ल्यु पेंट सोबत ३ वर्षाचा करार केला होता.
https://www.instagram.com/p/CCJGmimj2TN/
रिषभला ही आहे कारचे वेड
रिषभ पंतला ही कारचे वेड आहे. परंतु त्याच्याकडे मोजक्याच कार आहेत. ज्या कोट्यवधी रुपयांच्या आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज, ऑडी ए ८ आणि फोर्ड यांचा समावेश आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे २ कोटी, १.८० कोटी आणि ९५ लाख रुपये इतकी आहे. तसेच पंतचे उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे अलिशान घर आहे.
https://www.instagram.com/p/BenLCZQHiTu/
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिषभ पंतची कामगिरी
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवून देण्यात रिषभने मोलाची भूमिका बजावली होती. रिषभने आतापर्यंत एकूण २० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला १३५८ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने ६ अर्धशतक आणि ३ शतक झळकावले आहेत. तसेच १८ वनडे सामन्यात त्याने ५२९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याला ३ अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे. तसेच त्याच्या टी -२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ३३ सामने खेळले आहेत. यात त्याला ५१२ धावा करण्यात यश आले आहे. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वडिल गेल्यावर गुरुजींनी वाढवला सिराजचा आत्मविश्वास; म्हणाले, ‘बापाचे आशिर्वाद सोबत आहेत, तू…’
ऐकलंच पाहिजे! ‘किंग’ कोहली अन् ‘कोच’ शास्त्रींमधील संवादाचा ‘तो’ ऑडिओ लीक; इंटरनेटवर जोरदार व्हायरल