भारतीय संघ दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी सामना करण्यासाठी सज्ज आहे, जो 12 डिसेंबर रोजी सेंट जॉर्जेस पार्क, गेबेरहा येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने युवा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा याच्याबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आणि म्हटले की, तो सूर्यकुमार यादवसारखा खेळाडू आहे.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारताच्या या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने झाली. या मालिकेतील पहिला सामना डर्बनमध्ये होणार होता, मात्र तो पावसामुळे रद्द झाला. आता सर्व चाहते दुसऱ्या सामन्याची वाट पाहत आहेत.
दरम्यान, इरफान पठाण (Irfan Pathan) याने स्टार स्पोर्ट्सवर जितेश शर्मा (Jitesh Sharma) याच्याबद्दल बोलताना 2024 टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघातील निवडीचे समर्थन केले. मधल्या फळीत इशान किशन (Ishan Kishan) याच्या जागी जितेश शर्माला खेळवण्याबाबतही तो बोलला. उजव्या हाताच्या फलंदाजाने आतापर्यंत खेळलेल्या तीन टी20 सामन्यांमध्ये 164.10 च्या स्ट्राइक रेटने 64 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा माजी अनुभवी अष्टपैलू इरफान पठाण म्हणाला, “मी जितेशला माझ्या हाताने खाऊ घालीन. मी आधीच सांगितले आहे की, जर तुम्हाला ईशानला खेळायचे असेल, मग तो एकदिवसीय असो किंवा टी20 तुम्हाला त्याला टॉप ऑर्डरवर फलंदाजी करावी लागेल आणि टॉप ऑर्डरवर सध्या जागा नाही. जेव्हा तुम्ही मधल्या फळीत फलंदाजी करता तेव्हा तुमच्याकडे फिरकी असते आणि इशानला काही वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. जितेश शर्मा थोडा क्रिएटिव्ह खेळाडू आहे. तो सूर्यकुमार यादवसारखा खेळाडू आहे. तुम्हाला तो लॅप्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळताना दिसेल.”
30 वर्षीय जितेशने आयपीएल 2023 मध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. 16व्या हंगामात त्याने 14 सामन्यात 156.06 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या. (Like Jitesh Sharma Suryakumar Irfan Pathan’s shocking statement about the wicketkeeper batsman)
महत्वाच्या बातम्या
IPL 2024: दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी; आगामी हंगामात ऋषभ पंत खेळणार, पण असणार ‘ही’ अट
युवराज सिंगने टीम इंडियाचा कर्णधार न बनण्याचं सांगितलं कारण; म्हणाला, ‘सचिन आणि ग्रेग चॅपलमुळे…’