---Advertisement---

आयपीएलमध्ये पूर्वी सचिन आणि विराट ज्या सदम्यातून गेले, तो यावर्षी शुबमन गिलला बसला

On: मंगळवार, मे 30, 2023 12:27 PM
Shubman Gill
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम शुबमन गिल याच्या नेहमी लक्षात राहील. गिलने या हंगामात बॅटने तुपान प्रदर्शन केले आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला. याचसोबत आयपीएल हंगामाच्या शेवटी दोन मोठ्या पुरस्कारांचा मानकरी देखील ठरला. असे असले तरी, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावावर असणारा एक नकोसा विक्रम गिलच्या नावावर देखील झाला आहे.

गिलने आयपीएल 2023मध्ये ऑरेंज कॅप जिंकली आहे. हंगामात त्याने एकूण 890 धावा केल्या आहेत. एका आयपीएल हंगामात फलंदाजाने केकेल्या या दुसऱ्या सर्वाधिक धावा ठरल्या. यादीत पहिला क्रमांका विराट कोहली याचा आहे. विराटने आयपीएल 2016 मध्ये 973 धावा केल्या होत्या. गिलला या हंगामात ऑरेंज कॅपसह मोस्ट वॅल्यूएबल प्लेअर ऑफ द सीजन पुरस्कारही दिला गेला आहे. पण आपल्या संघाला गिल विजय मिळवून देऊ शकला नाही. यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासोबत देखील असाच काहीसा प्राकार घडला होता.

आयपीएल 2010मध्ये सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता आणि हंगामात त्याने सर्वाधिक 618 धावाही ठोकल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर सचिन ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाच, पण मोस्ट वॅल्यूएबल प्लेअर ऑफ द सीजनदेखील ठरला होता. सचिनची या हंगामातील कामगिरी जबरदस्त राहिली होती. पण चेन्नई सुपर किंग्जकडून त्याच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. सचिननंतर असेच काहीसे विराट कोहलीसोबत आयपीएल 2016मध्ये झाले.

विराट कोहली आयपीएल 2016मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार होता. त्याने या हंगामात विरोधी संघांच्या गोलंदाजांवर अक्षरशः गुडघे टेकण्याची वेळ आणली होती. विराटने या हंगामात 4 शतकांच्या जोरावर तब्बल 973 धावा कुटल्या होत्या. यासाठी त्याला ऑरेंज कॅपसह मोस्ट वॅल्यूएबल प्लेऑफरचा पुरस्कार दिला गेला होता. हंगामाच्या शेवटीपर्यंत विराटचा संघ विजेतेपद जिंकेल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. आता आयपीएल 2023मध्ये शुबमन गिलसोबत हा प्रकार घडला आहे. गिलने हंगामात गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक 890 धावा केल्या आहेत. यासाठी त्याला ऑरेंज कॅप आणि मोस्ट वॅल्यूएबल प्लेऑरचा पुरस्कार देखील मिळाला. पण आपल्या संघाला तो विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. (Like Sachin Tendulkar and Virat Kohli, the unwanted record in IPL was held by Shubman Gill this year)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी फॅमिली इमोशनल, झिवाची वडिलांना कडकडून मिठी, पाहा व्हिडिओ
पराभवाने खचला नाही हार्दिक पंड्या; धोनीबाबत मोठे विधान करत म्हणाला, ‘चांगल्या लोकांसोबत नेहमी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---