चेन्नई सुपर किंग्स संघाने गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाची धूळ चारली. यासह एमएस धोनी याने चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या गुजरात संघाकडे सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी होती, पण त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. या पराभवानंतर एमएस धोनीविषयी हार्दिक पंड्याने मोठे वक्तव्य केले.
काय म्हणाला हार्दिक?
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून पराभूत झाल्यामुळे गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. पराभवानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “आम्ही असा खेळ खेळलो की, आम्ही हारलो तरी सोबत, जिंकलो तरी सोबत. चेन्नई सुपर किंग्सने आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. मी शुबमन आणि साई सुदर्शनसाठी खुश आहे. मोहम्मद शमी, राशिद असो किंवा इतर खेळाडू त्यांनी आमची साथ दिली.”
एमएस धोनी (MS Dhoni) याच्या ट्रॉफी जिंकण्याविषयी आनंद व्यक्त करताना पंड्या म्हणाला की, “एमएस धोनीसाठी आयपीएल फायनल पराभूत व्हायला मला हरकत नाही. जर मला हारायचे असते, तेव्हा मी त्यांच्याकडूनच हारणे पसंत केले असते. चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलेच होते. मी ज्यांना ओळखतो, त्यामध्ये धोनी सर्वोत्तम आहे.”
सामन्याविषयी थोडक्यात
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर अंतिम सामन्यात गुजरात संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी गुजरातने साई सुदर्शन याच्या 46 चेंडूत 97 धावांच्या खेळीच्या जोरावर 4 विकेट्स गमावत 214 धावांपर्यंतची मजल मारली होती. पावसामुळे सामन्यातील आव्हान कमी झाले. त्यामुळे चेन्नईपुढे विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान मिळाले होते. अखेरच्या चेंडूवर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने चौकार मारत चेन्नईला हा सामना जिंकून दिला. चेन्नईचा हा पाचवा आयपीएल किताब आहे. विशेष म्हणजे, चेन्नई संघाने आता मुंबई इंडियन्ससोबत सर्वाधिक 5 वेळा किताब जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (gt skipper hardik pandya praise ms dhoni said good things happen to good people)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाव मोठं, लक्षण खोटं! कोट्यवधी रुपये घेऊनही ‘हे’ 5 स्टार खेळाडू फ्लॉपच, इंग्लंडच्या 3 पठ्ठ्यांचा समावेश
WTC Final साठी गेलेल्या भारतीय खेळाडूंनी लंडनमधून अनुभवला IPL फायनलचा थरार, फोटो पाहिले का?