कतारमध्ये रविवारी (18 डिसेंबर) खेळल्या गेलेल्या 22व्या फिफा विश्वचषकाचा (FIFA World Cup) विजेता मिळाला. लिओनल मेस्सी याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षानंतर फिफा विश्वचषक जिंकला. अर्जेंटिनाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रांसला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असे पराभूत केले. या सामन्यात मेस्सीने मैदानावर अनेक विक्रम रचले, तर मैदानाबाहेरही मोठ्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.
लिओनल मेस्सी (Lionel Messi) इंस्टाग्रामवर 400 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारा जगातील केवळ दुसराच व्यक्ती ठरला आहे. त्याच्याआधी पोर्तुगलचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याचे अधिक फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर 518 मिलियन फॉलोअर्स आहेत. मेस्सीच्या फॉलोअर्समध्ये रविवारी 5 पेक्षा अधिक मिलियनची भर पडली, तर मागील 30 दिवसांत 20 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स वाढले.
कारकिर्दीत जवळपास सर्व विक्रमे मोडणाऱ्या मेस्सीच्या जीवनात विश्वचषक जिंकायचा बाकी होता. आता त्याने तो ही पटकावला आहे. या स्पर्धेत त्याने 7 सामन्यांमध्ये खेळताना 7 गोल केले असून 3 असिस्टही केल्या आहेत. तसेच या स्पर्धेत गोल करण्यासाठी त्याने 17 संधी निर्माण केल्या.
मेस्सीने विश्वचषक जिंकल्यानंतर चषक हाती घेतलेला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने स्पॅनिशमध्ये लिहिले ‘वर्ल्ड चॅम्पियन्स’ मी कितीतरी वेळा ते स्वप्न पाहिले, मला ते इतके हवे होते की ते पूर्ण होत नव्हते, आता ते पूर्ण झाले असून माझा यावर विश्वास बसत नाही. माझ्या कुटुंबाचे, मला पाठिंबा देणाऱ्या आणि त्या सर्वांचे ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचे आभार.’
मेस्सीच्या या पोस्टला 20 तासांतच 50 मिलियनपेक्षा अधिक चाहत्यांनी लाईक केले आणि त्याने मोठा विक्रम मोडला. इंस्टाग्रामवर एखाद्या खेळाडूची पोस्ट इतकी लाईक केली जाणे ही पहिलीच वेळ आहे. हा विक्रम करताना मेस्सीने रोनाल्डोला मागे टाकले आहे. त्या दोघांनी बुद्धिबळ खेळतानाची पोस्ट रोनाल्डोने इंस्टाग्रामवर शेअर केली होती. ज्याला 41.9 मिलियन लोकांनी लाईक केले होते.
https://www.instagram.com/p/CmUv48DLvxd/?utm_source=ig_web_copy_link
विश्वचषकानंतर मेस्सी आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्त होणार अशा चर्चांना उधान आले होते, मात्र त्याने त्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्याला अर्जेंटिनासाठी एक चॅम्पियन म्हणून खेळायचे आहे, असे 35 वर्षीय मेस्सीने विश्वचषकानंतर म्हटले.
अर्जेंटिना आतापर्यंत 1978, 1986 आणि 2022 असे तीनदा विश्वचषक जिंकली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईयन एफसीने कमबॅक केले, केरळा ब्लास्टर्सला बरोबरीत रोखले
लईच चोपलयं! फक्त 13 वर्षांच्या पोराने पाडला 38 षटकार अन् 30 चौकारांचा पाऊस