एकविसाव्या शतकातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लियोनेल मेस्सीने मंगळावारी(१६ मार्च) आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. ला लीगाच्या साखळी सामन्यात हुएस्का एफसीविरूद्धच्या सामन्यात मैदानावर उतरताच त्यांनी झावी हर्नांडीझच्या विक्रमाची बरोबरी केली. बार्सिलोनाच्या प्रशिक्षकांनी देखील त्याच्या या उपलब्धतेविषयी त्याचे अभिनंदन केले.
झावीच्या विक्रमाची बरोबरी
ला लीगाच्या साखळी सामन्यात हुएस्का एफसीविरूद्धच्या सामन्यात मेस्सी मैदानात उतरला. त्याबरोबरच बार्सिलोनाचा माजी दिग्गज मिडफिल्डर झावी हर्नांडीझच्या बार्सिलोनासाठी सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. आता झावी आणि मेस्सी यांनी बार्सीलोनासाठी प्रत्येकी ७६७ सामने खेळले आहेत.
प्रशिक्षकांनी केले अभिनंदन
बार्सिलोनाने या सामन्यात हुएस्का एफसीला ४-१ अशा फरकाने पराभूत केले. स्वतः मेस्सीने या सामन्यात दोन गोल झळकावले. विक्रमी सामना खेळत असताना बार्सिलोनाचे प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी मेस्सीला बार्सिलोनाच्या इतिहासातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हटले.
मेस्सीची कारकीर्द
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू असलेला ३३ वर्षीय मेस्सी वयाच्या तेराव्या वर्षापासून बर्सिलोनाच्या संघाचा भाग आहे. अगदी कमी वयापासूनच त्याचे बार्सिलोना संघासोबत नाते राहिले आहे. अर्जेंटिनाच्या वरिष्ठ संघासाठी खेळताना त्याने ४६५ गोल नोंदवले आहेत. अर्जेंटिनाचा कर्णधार असलेल्या मेस्सीने २००५ पासून अर्जेंटिनासाठी खेळताना १४२ सामन्यात ७१ गोल केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीला पहिल्यांदाच मिळाला जेतेपदाचा मान; फायनलमध्ये एटीके मोहन बागान पराभूत
बार्सिलोना क्लबचे माजी अध्यक्ष बार्तोमेओ यांना अटक, बार्सागेट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई
ऐतिहासिक! सोशल मीडियावर ५०० मिलियन फॉलोअर्स असणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील पहिलाच खेळाडू