---Advertisement---

‘अर्जेंटिनासाठी माझा शेवटचा सामना…’, विश्वचषक फायनलनंतर मेसी घेणारा निवृत्ती

Lionel Messi
---Advertisement---

अर्जेंटीना फुटबॉल संघाचा कर्णधार आणि दिग्गज लियोनल मेसी याने मोठी घोषणा केली आहे. फिफा विश्वचषक 2022 मध्ये त्यांचा संघ अंतिम सामन्यात जागा पक्की करू शकणारा पहिला संघ बनला आहे. अंतिम सामना खेळल्यानंतर मेसी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने स्वतः स्पष्ट केले आहे. मेसेकडून या अंतिम सामन्यात अर्जेंटिना संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे आणि गोल्डन बुट नावावर करण्याची संधी आहे. 

अंतिम सामन्यात लिओनल मेसी (Leonel Messi) यान स्वतः स्पष्ट केले की, 18 डिसेंबर रोजी फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून मायमची माघार घेणार आहे. उपांत्य सामन्यात मेसीने पेनल्टीमध्ये गोल केला आणि स्वतःच्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले. या सामन्यात जूलियन अल्वारेजने देखील दोन अप्रतिम गोल केल आणि अर्जेंटिनाने क्लोएशियाला 3-0 अशा अंतराने पराभूत केले. या विजयानंतर मेसीने जाहीर केले की, विश्वचषकाचा अंतिम सामना म्हणेजे अर्जेंटिना संघासाठी त्याचा शेवटचाच सामना असेल.

अर्जेंटिनातील वृत्तसंस्था आलटलेट डियारियो डेपोर्टिओने दिलेल्या माहितीनुसार मेसी म्हणला की, “संघ अंतिम सामन्यात पोहोचवू शकल्यामुळे मी आनंदी आहे. अंतिम सामन्यात मी देशासाठी शेवटचाच सामना केळणार आहे आणि हा प्रवास इथेच संपेल. पुढच्या विश्वचषकाला अजून खूप वर्ष आहेत आणि मला नाही वाटत की मी पुढच्या विश्वचषकात खेळू शकेल. अशा प्रकारे (अंतिम सामन्यात) शेवट करणे माझ्यासाठी सर्वोत्तम स्थिती आहे.”

मेसी सध्या 35 वर्षांचा आहे आणि त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील हा 35 वा फिपा विश्वचषक आहे. त्याने अर्जेंटिनाचे दिग्गज डिएगो माराडोना आणि डेवियर माशेरानो यांना मागे सोडले आहे. या दोघांनीह संगासाठी चार विश्वचषक खेळले आहेत. यावर्षीच्या विश्वचषकात सहभागी झाल्यानंतर मेसीने या दोंघांचा विक्रम मोडीत काढला. मेसीने चालू विश्वचषकात आतापर्यंत पाच गोल केले आहेत आणि विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत गेब्रियल बितिस्तुता याला मागे टाकले आहे. गेब्रियल बितिस्तुताने विश्वचषकात आतापर्यंत 11 गोल केले आहेत आणि याबाबतीत मेसी आता त्याच्या पुढे गेला आहे.

दरम्यान अर्जेंटिना संघ यावर्षी सहाव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. मेसाचा हा शेवटचा सामना असल्यामुळे संघ विजेतेपदासाठी सर्व ताकतीने प्रयत्न करेल, असेच सध्या दिसत आहे. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना फ्रांस आणि मोरक्को यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकले, तो अंतिम सामन्यात अर्जेंटिनासोबत खेळताना दिसेल.  (Lionel Messi will retire from international football after the FIFA World Cup 2022.)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शाहिद आफ्रिदीचा पाकिस्तान संघाला घरचा आहेर, ‘या’ दिग्गज खेळाडूला बाहेर काढण्याची मागणी
पहिल्या कसोटीत विराट स्वस्तात बाद! बांगलादेशी फिरकीपटूच्या जाळ्यात सहज अडकला माजी कर्णधार 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---