नाॅटिंगहॅम | बुधवारी इंग्लंड संघाने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. ५० षटकांत या संघाने चक्क ६ बाद ४८१ धावा केल्या.
हे करताना त्यांनी त्यांचाच दोन वर्ष जूना ४४४ धावांचा विक्रम मोडला. परंतु बुधवारीच अन्य एका प्रथम श्रेणी सामन्यात भारत अ संघाने लीसेस्टरशायर संघाविरुद्ध ५० षटकांत ४ बाद ४५८ धावा केल्या. या अ दर्जाच्या सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या धावा होत्या.
या सामन्यात भारताकडून सलामीवीर मयांक अग्रवालने १०६ चेंडूत नाबाद १५१ धावांची जबरदस्त खेळी केली. तर दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉने २० चौकार आणि ३ षटकारांची बरसात करत ९० चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या.
या दोघांनी भारतासाठी २२१ धावांची सलामी दिली. पृथ्वी शॉ परतल्यानंतर युवा खेळाडू शुभमन गिलने तुफान फटकेबाजी करत केवळ ५४ चेंडूत ८६ धावा केल्या.
अ दर्जाच्या सामन्यात सरे संघाने २००७मध्ये ओव्हलवर ग्लॉस्टरशायर संघाविरुद्ध ५० षटकांत चक्क ४ बाद ४९६ धावा केल्या होत्या. हा अ दर्जाच्या सामन्यातील विक्रम आहे.
त्यामुळे काल या यादीत भारत अ (४५८) दुसऱ्या स्थानी आला होता. परंतु त्यानंतर इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया सामन्यात इंग्लंडने ४८१ धावा करत केवळ ३ तासांत हा विक्रम आपल्या नावे केला.
अ दर्जाच्या सामन्यांत संघाने केलेल्या सर्वोच्च धावा-
४९६- सरे विरुद्ध ग्लॉस्टरशायर, २००७
४८१- इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया, २०१८ (काल)
४५८- भारत अ विरुद्ध लीसेस्टरशायर, २०१८ (काल)
४४५- नॉटिंगहॅमशायर विरुद्ध नॉर्थॅमटनशायर, २०१६
४४३- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, २०१६
आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जून तेंडूलकरबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी
-पृथ्वी शाॅ पुन्हा गरजला, २० चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी
-अबब ! इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला पाजले पाणी; वनडेत चोपल्या ४८१ धावा
-धावा केल्या इंग्लंडने ४८१; टेन्शन घेतलंय या भारतीय माजी कर्णधारान
-४८१ धावा तर केल्या; परंतु अजून १६ धावा केल्या असत्या तर इतिहास घडला असता!