सोमवारी (दि. 13 फेब्रुवारी) मुंबई येथे पहिल्या-वहिल्या महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा लिलाव पार पडला. या लिलावात जगभरातील अनेक खेळाडूंचे नशीब फळफळले. काही खेळाडू एकाच झटक्यात कोट्यवधी रुपयांच्या मालकीण बनल्या, तर काही खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. मात्र, या लिलावात 1 कोटींहून अधिक रुपयांहून अधिक रुपये मिळालेल्या 10 भारतीय खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया…
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेच्या लिलावात भारतीय संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिच्यावर विक्रमी बोली लागली. ती या हंगामातील लिलावात सर्वाधिक रक्कम मिळवणारी महिला खेळाडू ठरली. तिच्यासाठी बोलींच्या चढाओढीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने मुंबई इंडियन्सला पछाडत 3.40 कोटी सर्वाधिक बोली लावत आपल्या ताफ्यात सामील केले.
Base Price: INR 50 Lakh
Goes to @RCBTweets: INR 3.40 Crore
How about that for the first-ever Player Bid in the history of the #WPLAuction! 👏 👏 pic.twitter.com/TYo51Auiz4
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2023
या लिलावात एकूण 10 भारतीय खेळाडू 1 कोटींहून अधिक रुपये मिळवण्यात यशस्वी झाल्या. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला मुंबई इंडियन्स (Mumabi Indians) संघाने मंधानापेक्षा अर्ध्या किंमतीत म्हणजेच 1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले. ती मुंबईची सर्वात महागडी खेळाडूदेखील नाहीये. कारण, मुंबईने नॅट सायव्हर (Nat Sciver) हिला 3.20 कोटींची बोली लावत संघात सामील केले आहे.
Say hello to @mipaltan's first signing at the #WPLAuction – @ImHarmanpreet 👋#WPLAuction pic.twitter.com/eS7PxzYfFM
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2023
खरं तर, हरमनप्रीत ही लिलावात खरेदी करण्यात आलेल्या अव्वल सहा भारतीय महिला खेळाडूंमध्येही नाहीये. कारण, देशाची दुसरा सर्वात महागडी खेळाडू ही अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आहे. तिला यूपी वॉरिअर्सने 2.60 कोटी रुपयात सामील केले.
भारतीय संघाची विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखली जाणारी शफाली वर्मा (Shafali Verma) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाने अनुक्रमे 2 आणि 2.20 कोटी रुपयात सामील केले. अष्टपैलू पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) हिला मुंबईने 1.90 कोटी, तर ऋचा घोष (Richa Ghosh) हिला आरसीबीने 1.90 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले.
Welcome on board, say @DelhiCapitals to @TheShafaliVerma 👏 👏#WPLAuction pic.twitter.com/tgPNcvEYew
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2023
याव्यतिरिक्त यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) हिला मुंबईने 1.50 कोटी रुपयात सामील केले. दुसरीकडे, रेणुका सिंग (Renuka Singh) हिलाही आरसीबीने 1.50 कोटीत संघात घेतले. तसेच, देविका वैद्य (Devika Vaidya) हिला यूपी वॉरिअर्सने 1.40 कोटींमध्ये संघात सामील केले.
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा 4 ते 26 मार्च यादरम्यान पार पडणार आहे. स्पर्धेची सुरुवात मुंबई विरुद्ध गुजरात संघात पार पडेल अशी माहिती आहे. (list of 10 indian cricketers gets more than 1 crore rupees in wpl auction 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात मिळाला नाही खरेदीदार; ‘या’ दिग्गज खेळाडूने थेट सोशल मीडियावर मांडले दु:ख
‘वॅलेंटाईन्सन डे’ची वेळ साधून पृथ्वी शॉकडून गर्लफ्रेंडच्या नात्यावर शिक्कामोर्तब, लिहिले…