---Advertisement---

आजपर्यंतच्या सर्व चॅम्पियन्स ट्रॅाफी विजेत्यांची यादी! पहा एका क्लिकवर

---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना भारत न्यूझीलंड संघात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले. (ICC Champions Trophy Final) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) ही एक प्रमुख वनडे क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगातील अव्वल 8 संघ जेतेपदासाठी आमने-सामने येतात. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील विजेत्यांच्या यादीबद्दल जाणून घेऊया.

चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 1998 मध्ये झाली. 1998 मध्ये दक्षिण आफ्रिकेने फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवून चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले होते. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला 4 गडी राखून पराभूत केले होते. 2000 मध्ये न्यूझीलंडने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली होती. 2002 मध्ये भारत आणि श्रीलंका दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते. हा सामना पावसामुळे 2 वेळा रद्द झाल्याने भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. त्यानंतर 2004 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडला 2 गडी राखून पराभूत केले आणि जेतेपदावर आपले नाव कोरले. 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये वेस्ट इंडिजला 8 विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली.

2009 मध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली. यावेळी संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा 6 गडी राखून धुव्वा उडवला होता. 2013 मध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली होती. संघाने फायनलमध्ये इंग्लंडला 5 धावांनी पराभूत केले. 2017 मध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत करून चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली. दरम्यान पाकिस्तानने फायनलमध्ये भारताला 180 धावांनी पराभूत केले होते.

आता 2025च्या चॅम्पियन्स ट्राॅफीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील नेतृत्वाखालील भारतीय संघाने आपले नाव कोरले.

चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांची यादी-

1998: दक्षिण आफ्रिका
2000: न्यूझीलंड
2002: भारत आणि श्रीलंका (संयुक्त विजेते)
2004: वेस्ट इंडीज
2006: ऑस्ट्रेलिया
2009: ऑस्ट्रेलिया
2013: भारत
2013: पाकिस्तान
2025: भारत

महत्त्वाच्या बातम्या-

हिटमॅन’चा धमाका; आयसीसी स्पर्धेत पहिले अर्धशतक
IND vs NZ; भारताचा अभूतपूर्व विजय..! 12 वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीवर मोहोर!
श्रेयस अय्यर अर्धशतकापासून मुकला; सामना रोमांचक वळणावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---