जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगमाला ९ एप्रिल रोजी सुरुवात होत आहे. स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी होणार आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेल्या या आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेते आयोजन कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच नेहमीप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स संघाची जोरदार चर्चा आहे.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून नीता अंबानींची मालकी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते. आयपीएलमधील एक महागडा संघ म्हणूनही मुंबईकडे पाहिले जाते. चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स संघाचे कट्टर असे चाहते आहेत, जे फारसे इतर कोणत्याही संघाला लाभले नाही. यामुळे या दोन संघाच्या चाहत्यांमध्ये कायमच वादही दिसतात.
चेन्नई संघाचा कर्णधार कोण किंवा यापुर्वी चेन्नईचे कोण कोण कर्णधार झाले असे विचारले असता एमएस धोनी व सुरेश रैना ही नावे चटकन डोळ्यासमोर येतात. परंतू मुंबईबाबतीत मात्र असे होत नाही. सुरुवातीच्या काळात सचिन कर्णधार असूनही त्याला दुखापतीमुळे संघाचे नेतृत्त्व करता आले नाही. यामुळे अनुभवी हरभजन सिंगने २००८ ते २०१२ या काळात तब्बल ३० सामन्यात मुंबईचे नेतृत्त्व केले होते.
मुंबईकडून सर्वाधिक सामन्यात संघाचे नेतृत्त्व करण्याचा मान रोहित शर्माला मिळाला आहे. सध्या कर्णधारपदाचीच जबाबदारी सांभाळत असलेल्या रोहितने तब्बल १२१ सामन्यात संघाचे नेतृत्त्व केले आहे. सन २०१३मध्ये पहिल्यांदा कर्णधार झालेल्या रोहितने ७२ विजय व ४५ पराभव पाहिले आहेत. शिवाय रोहितच्या नेतृत्त्वाखाली चार सामने बरोबरीत सुटले आहेत.
रोहित पाठोपाठ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ५५ सामन्यात मुंबईचे नेतृत्त्व केले आहे. २००८ ते २०११ या काळात नेतृत्त्व करताना मुंबईने ३२ विजय व २३ पराभव पाहिले. भज्जीने ३० सामन्यात नेतृत्त्व केले परंतू तब्बल १४ सामन्यात संघाला पराभव पाहिला लागला व १४ सामन्यात संघाने विजय मिळवला. २ सामन्यांचा निकाल लागला नाही.
याखेरीज रिकी पॉटींगने २०१३मध्ये ६ सामन्यात नेतृत्त्व करताना ३ विजय व ३ पराभव पाहिले. कायरन पोलार्डलाही ८ सामन्यात ५ विजय व ३ पराभव पहावे लागले. शॉन पोलॉकने २००८मध्ये ४ सामन्यात संघाच्या नेतृत्त्वाची धुरा वाहताना ४ सामन्यात ३ विजय व १ पराभव पाहिला तर गमतीचा भाग म्हणजे ड्वेन ब्राव्होने केवळ १ साम्यात मुंबईचे नेतृत्त्व केले व त्यात संघाला पराभव पाहावा लागला.
अशा प्रकारे रोहित, सचिन, हरभजन, पॉटींग, पोलार्ड, पोलॉक व ब्राव्होसारख्या दिग्गजांनी मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा वाहिली. परंतू आयपीएलची चमचमती ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न केवळ रोहितलाच पुर्ण करता आले.
महत्त्वाच्या बातम्या –
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी; या ४ भारतीयांचा आहे समावेश
कोणाला आहे यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्याची सर्वाधिक संधी? गावसकरांनी वर्तवला अंदाज
सचिनची २० वर्षांपुर्वी पुण्यात १० हजार वनडे धावा करण्याची हुकली होती संधी