---Advertisement---

‘हे’ खेळाडू राहणार आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर, पाहा संपूर्ण यादी

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचा थरार येत्या १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या बलाढ्य संघांमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण ६० सामने खेळवले जाणार होते. परंतु, २९ सामने झाल्यानंतर या स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला होता. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. तसेच स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३१ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात काही संघांना मोठा धक्का बसू शकतो. कारण संघातील मुख्य खेळाडूंनी काही कारणास्तव स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. जाणून घ्या या सर्व खेळाडूंची यादी.

पॅट कमिन्स 
आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता. आता या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसू शकतो. कारण या संघातील मुख्य अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स या स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल. माध्यमातील वृत्तानुसार, पॅट कमिन्स लवकरच बाबा होणार आहे. त्यामुळे त्याने ही स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे.

जोस बटलर
राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात मोठा धक्का बसणार आहे. या संघातील विस्फोटक यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध नसणार आहे. तो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाबा होणार आहे. ज्यामुळे, त्याने घरी राहून आपली पत्नी आणि बाळाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲडम झांपा 
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी मोठा धक्का दिला आहे. या संघातील फिरकीपटू ॲडम झांपा आणि केन रिचर्डसन यांनी आयपीएल स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडूंची ऑस्ट्रेलियाच्या अंतिम १५ सदस्यांमध्ये निवड झाली आहे. याच कारणास्तव त्यांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या जागी श्रीलंका संघाचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा आणि दूश्मंता चमिरा यांना संधी देण्यात आली आहे. (List of players who will be missed in remaining matches of ipl 2021)

डेनियल सॅम्स
ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज डेनियल सॅम्स याने मानसिक आरोग्याचा हवाला देत स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. डेनियल सॅम्स हा आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच पंजाब किंग्ज संघातील खेळाडू राइली मेरेडिथ आणि झाय रिचर्डसन यांनी आयपीएल स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. मेरेडिथ साईड स्ट्रेंनचा सामना करत आहे. तर झाय रिचर्डसनने मानसिक आरोग्याचा हवाला देत स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलमध्ये देखील ‘द हंड्रेड’च्या ‘या’ नियमाला लागू केले पाहिजे, माजी इंग्लिश खेळाडूचा सल्ला

सारा तेंडुलकरने भाऊ अर्जुनकडे व्हिडिओ कॉलवरच रक्षाबंधनाच्या गिफ्टची मागणी, मुंबई इंडियन्सने शेअर केला खास व्हिडिओ

इंग्लंडला बसणार मोठा धक्का? ‘हा’ प्रमुख खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेबरोबरच ऍशेसमधून माघार घेण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---