जगभरात सध्या क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आपणाला आता वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होतांना दिसत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पार्श्वभूमीवर अनेक देशातील क्रिकेट बोर्डांनी त्यांच्या त्यांच्या क्रिकेट स्पर्धा चालू केल्या. ज्यामध्ये बिग बॅश लीग, टी-२० ब्लास्ट, श्रीलंका प्रीमियर लीग, कॅरिबियन प्रीमियर लीग, इत्यादींचा समावेश आहे.
याच पार्श्वभूमीवर इंग्लंडने टी-२० प्रकाराला आणखी छोटे करत, १०० चेंडूची स्पर्धा ‘द हंड्रेड’चे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा अंतिम सामना शनिवारी (२१ ऑगस्ट) पार पडला. ज्यामध्ये पुरूषांच्या स्पर्धेत साउदर्न ब्रेवने बर्मिंघम फोनिक्सला ३२ धावांनी हरवत ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या पहिल्या किताबावर आपले नाव कोरले. तर महिलांच्या स्पर्धेत साउदर्न ब्रेवला ओवल इनविजीबल्स संघाकडून पराभव पत्करावा लागला.
‘द हंड्रेड’ स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन झाल्यानंतर इंग्लंडचा माजी खेळाडू डेविड गॉवरने आयपीएलसाठी आता एक सल्ला दिला आहे. त्यांच्यानुसार आयपीएलमध्ये ‘द हंड्रेड’ या स्पर्धेतील एक नियम लागू केला पाहिजे. तो म्हणजे ‘ओव्हर रेट’चा नियम.
एका वेबसाईटशी बोलताना गॉवर म्हणाले, “द हंड्रेड या स्पर्धेत एक नियम होता, ज्यानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जर गोलंदाजी करायला वेळ लावला, तर त्या संघावर दंड लावला जातो. असाच नियम आयपीएलमध्ये देखील लागू केला जाऊ शकतो. यामुळे सामन्यांमध्ये खूप फरक पडू शकतो.”
दरम्यान, पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये आणखी २ संघांचा समावेश होणार आहे. त्यामुळे पुढील आयपीएलमध्ये ‘द हंड्रेड’च्या या नियमाचा समावेश केला जाऊ शकतो, की नाही, हे बघावे लागेल. याबाबत गॉवावर पुढे म्हणाले, “आयपीएलमध्ये ओव्हर रेटशी संबंधित कोणतीही अडचण नाही. मात्र, आयपीएलने देखील हा नियम लागू केल्यास स्पर्धेसाठी चांगले राहील. आज-काल खेळाडूंवर दंड लावणे तसे काही उपयोगाचे नाही. कारण आजच्या खेळाडूंची कमाई देखील खूप जास्त आहे.
ओव्हर रेट नियम नक्की काय आहे समजून घेऊयात
या नियमानुसार एखादा संघ क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करायला उशीर लावत असेल, तर त्या संघाला क्षेत्ररक्षणात बदल करावा लागतो. तसेच संथ गोलंदाजी केल्यामुळे याची पेनल्टी म्हणून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्यांचा एक अतिरिक्त खेळाडू ‘थर्टी याड सर्कल’मध्ये आणावा लागतो. ज्यामुळे सीमारेषेजवळचा एक खेळाडू कमी होतो.
महत्त्वाच्या बातम्या –
–सारा तेंडुलकरने भाऊ अर्जुनकडे व्हिडिओ कॉलवरच रक्षाबंधनाच्या गिफ्टची मागणी, मुंबई इंडियन्सने शेअर केला खास व्हिडिओ
–इंग्लंडला बसणार मोठा धक्का? ‘हा’ प्रमुख खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेबरोबरच ऍशेसमधून माघार घेण्याची शक्यता
–‘विरुष्का’चं सरप्राईज! लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात भारतीय शेफला केलं चकीत