---Advertisement---

आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी, टाॅप-10 मध्ये भारतीयांचा दबदबा

---Advertisement---

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावानंतर आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वोच्च किंमतीला विकल्या गेलेल्या खेळाडूंची यादी अपडेट करण्यात आली आहे. आता इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून आला आहे. आयपीएल 2024 च्या मोसमापर्यंत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये फक्त दोनच खेळाडू भारतीय होते. मात्र आता या यादीत 5 खेळाडूंचा समावेश झाला आहे. इतकेच नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूही आता भारतीय आहे. भारतीय खेळाडूचे नाव केवळ अव्वलच नाही तर दुसऱ्या क्रमांकावरही आहे.

आयपीएल लिलावात विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये रिषभ पंत अव्वल स्थानावर आहे. ज्याला लखनऊ सुपर जायंट्सने यंदाच्या 2025 च्या मेगा लिलावात 27 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र, लिलावात 25 कोटींची बोली ओलांडणारा पहिला श्रेयस अय्यर होता. त्याला पंजाब किंग्जने या मोसमात 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. तो आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिषभ पंतने काही वेळातच त्याला मागे टाकले होते. गेल्या मोसमात 24.75 कोटी रुपयांना विकला गेलेला मिचेल स्टार्क 2024 पर्यंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता. परंतु आता तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत चौथे नाव व्यंकटेश अय्यरचे आहे. या भारतीय अष्टपैलू खेळाडूला यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पाचव्या क्रमांकावर पॅट कमिन्स आहे. ज्याला हैदराबादने गेल्या मोसमात 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते. सहाव्या क्रमांकावर सॅम करन आहे, ज्याला 2023 मध्ये पंजाब किंग्जने 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याचबरोबर या मोसमात पंजाब किंग्जने 2 खेळाडूंना 18-18 कोटी रुपयांना खरेदी केले. त्यापैकी एक अर्शदीप सिंग आणि दुसरा युजवेंद्र चहल अनुक्रमे 7 आणि 8 व्या क्रमांकावर आहे. कॅमेरॉन ग्रीन 17.50 कोटी रुपयांसह 9व्या क्रमांकावर असून दहाव्या स्थानी बेन स्टोक्स आहे. ज्याला 2023 मध्ये 16.25 कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले होते.

आयपीएल लिलावात विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या खेळाडूंची यादी

1. रिषभ पंत – रु. 27 कोटी – लखनऊ सुपर जायंट्स – 2025

2. श्रेयस अय्यर – रु. 26.75 कोटी – पंजाब किंग्स – 2025

3. मिचेल स्टार्क – रु. 24.75 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स – 2024

4. व्यंकटेश अय्यर – रु. 23.75 कोटी – कोलकाता नाईट रायडर्स – 2025

5. पॅट कमिन्स – रु. 20.50 कोटी – सनरायझर्स हैदराबाद – 2024

6. सॅम करन – रु. 18.50 कोटी – पंजाब किंग्स – 2023

7. अर्शदीप सिंग – रु. 18 कोटी – पंजाब किंग्स – 2025

8. युझवेंद्र चहल – रु. 18 कोटी – पंजाब किंग्स – 2025

9. कॅमेरून ग्रीन – रु. 17.50 कोटी – मुंबई इंडियन्स – 2023

10. बेन स्टोक्स – रु. 16.25 कोटी – चेन्नई सुपर किंग्ज – 2023

हेही वाचा-

कोणत्या संघाने किती खेळाडूंना खरेदी केले, कोणाकडे किती पैसे शिल्लक? पाहा सर्वकाही एका क्लिकवर
ऑस्ट्रेलियन संघात फूट पडली? जोश हेझलवूडच्या विधानानं खळबळ!
दिल्लीसोबतचं नातं संपल्यानंतर रिषभ पंतची भावनिक पोस्ट, चाहत्यांना उद्देशून म्हणाला…

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---