Indian batsman who scored the fastest half-century in ODIs: वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा रेकाॅर्ड कोणत्याही विस्फोटक फलंदाजाच्या नावावर नाही. या यादीत अनेक दिग्गज फलंदाज आहेत, पण सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज आहे. ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या टॉप-7 खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात. (Fastest ODI fifty for India)
1) अजित आगरकर: माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर या यादीत पहिल्या स्थानावर आहे. आगरकरने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. आगरकरने हा पराक्रम 25 वर्षांपूर्वी केला होता आणि त्याचा हा रेकाॅर्ड आजपर्यंत कोणताही भारतीय फलंदाज मोडू शकलेला नाही. आगरकरने 2000 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध फक्त 21 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. (Ajit Agarkar fastest fifty)
2) कपिल देव: भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी 1983 मध्येच वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहास रचला होता. कपिलने त्यावेळी फक्त 22 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले होते. (Kapil Dev Fastest Fifty)
3) वीरेंद्र सेहवाग: माजी भारतीय सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आगरकरचा हा रेकाॅर्ड मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण तो ते करू शकला नाही. आगरकरने रेकाॅर्ड केल्यानंतर 1 वर्षानंतर, 2001 मध्ये सेहवागने केन्याविरुद्ध 22 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. (Virender Sehwag ODI record)
4) राहुल द्रविड: ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडचे नावही या यादीत आहे. द्रविडने 2003 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध फक्त 22 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकून आपले नाव इतिहासात नोंदवले. (Rahul Dravid fastest fifty)
5) युवराज सिंग: भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने बांगलादेशविरुद्ध धडाकेबाज खेळी खेळली होती. युवराजने 2004 मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्ध फक्त 22 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. (Yuvraj Singh ODI stats)
6) सूर्यकुमार यादव: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे नावही या यादीत समाविष्ट आहे. सूर्याने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 24 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून इतिहास रचला होता. (Suryakumar Yadav fastest fifty)
7) कृणाल पांड्या: भारतीय अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने 2021 मध्येच आपले नाव या यादीत समाविष्ट केले होते. कृणालने इंग्लंडविरुद्ध फक्त 26 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले होते. (Krunal Pandya ODI Fifty)






