न्यूझीलंड संघाची स्टार क्रिकेटपटू सोफी डिवायन ही आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रचलित आहे. काहीदिवसांपूर्वीच न्यूझीलंडमध्ये ओटागो महिला आणि वेलिंग्टन महिला संघात एक देशांतर्गत सामना खेळला गेला. ज्यामध्ये वेलिंग्टन महिला संघाची खेळाडू सोफी डिवायनने आक्रमक फलंदाजी करताना 38 चेंडूत 108 धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या दरम्यान तिने 9 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकारांची बरसात केली. त्यामधील मारलेला एक षटकार स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका छोट्या मुलीच्या डोक्यावर जावून आढळला. त्यानंतर सोफी डिवायनने जे केले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा सामना संपल्यानंतर सोफी डिवायन चेंडू लागलेल्या मुलीकडे गेली. त्यांनंतर सोफी डिवायनने आपली टोपी त्या मुलीला दिली. तसेच त्या छोट्या मुलीसोबत काही फोटो काढले. या सर्व घटनेचा व्हिडिओ न्यूझीलंड महिला संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. त्यामुळे हा व्हिडीओ सद्ध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोक सोफी डिवायनची स्तुती करत आहेत.
ओटागो महिला संघाच्या गोलंदाजाच्या चिंध्या करताना सोफी डिवायनने एक उत्कृष्ठ खेळी केली साकारली. त्यामुळे वेलिंग्टन महिला संघाने हा सामना जिंकला. ओटागो महिला संघाने 129 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेलिंग्टन महिला संघाने हे लक्ष्य 8.4 षटकात पूर्ण केले.
https://twitter.com/WHITE_FERNS/status/1349543971840671745?s=19
इंग्लंड आणि न्यूझीलंड महिला संघात तीन सामन्याची वनडे मालिका 23 फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. या मालिकेनंतर या दोन्ही संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. वनडे मालिकेतील तीन सामने अनुक्रमे 23, 26 आणि 28 फेब्रुवारीला खेळले जाणार आहेत. त्यानंतर टी-20 मालिकेतील तीन सामने अनुक्रमे 3, 5 आणि 7 मार्च खेळले जातील.
महत्त्वाच्या बातम्या –
PAK vs SA : कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा २० जणांचा संघ जाहीर; तब्बल ८ खेळाडूंना डच्चू
मोहम्मद अझरुद्दीनची विश लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ गोष्टींचा आहे समावेश