---Advertisement---

विजयाची नितांत गरज असलेल्या हैदराबादची दिल्लीपुढे अग्निपरिक्षा, पाहा उभयंतांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 3:59 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीत सुरू आहे. आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील ३ सामने पार पडले असून चौथा आणि संपूर्ण हंगामातील ३३ वा सामना बुधवारी (२२ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अशात गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेल्या हैदराबाद संघाचे लक्ष्य विजयी सुरुवातीकडे असेल. तर गुणातालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला दिल्लीचा संघ त्यांची विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल.

केव्हा खेळला जाईल दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना?
दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यातील आयपीएल २०२१ मधील ३३ वा सामना बुधवार रोजी, २२ सप्टेंबर खेळला जाईल.

किती वाजता सुरू होईल दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना?
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्याची सुरुवात होईल. तत्पूर्वी ७ वाजता नाणेफेक होईल.

कुठे खेळवला जाईल दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना?
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे खेळवला जाईल.

भारतात टिव्हीवर कसा पाहाल दिल्ली विरुद्ध हैदराबाद लाईव्ह सामना?
दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यातील लाईव्ह सामन्याचा आनंद टिव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर लुटता येईल. हिंदी आणि इंग्रजीशिवाय इतर ६ भाषांमध्येही हा सामना पाहता येतील.

कशी पाहाल दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्याची ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग?
दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यातील लाईव्ह सामन्याचा आनंद ऑनलाईन डिज्नी+हॉटस्टारवर लुटता येईल. परंतु त्यासाठी तुमच्याकडे डिज्नी+हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन असणे गरजेचे आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ-
पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान/उमेश यादव, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्किए

सनरायझर्स हैदराबादचा संभाव्य संघ-
डेविड वॉर्नर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केन विलियम्सन (कर्णधार), मनीष पांडे, केदार जाधव, अब्दुल समद, मोहम्मद नबी, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! विलियम्सनच्या संघातील ‘हा’ खेळाडू कोरोना संक्रमित, मग दिल्ली-हैदराबाद सामना होणार की नाही?

रोमहर्षक विजयासह राजस्थानची सरशी, तर पंजाब खालून दुसऱ्या स्थानी; पाहा गुणतालिकेची सद्यस्थिती

टी२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्येही नाही मिळालं स्थान, युएईतील पहिल्याच सामन्यात ‘त्याने’ केला कहर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---