---Advertisement---

ब्रेकिंग! विलियम्सनच्या संघातील ‘हा’ खेळाडू कोरोना संक्रमित, मग दिल्ली-हैदराबाद सामना होणार की नाही?

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 3:09 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा सध्या संयुक्त अरब अमिरातीत सुरू आहे. आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील ३ सामने पार पडले असून चौथा आणि संपूर्ण हंगामातील ३३ वा सामना बुधवारी (२२ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

कोविड-१९ मुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल २०२१ वर पुन्हा या जागतिक महामारीचे सावट पसरले आहे.

पुन्हा आयपीएलच्या कडक बायो बबलमध्ये कोरोनाचा प्रसार होताना दिसण्याची भिती आहे. कारण सहभागी ८ आयपीएल फ्रँचायझींपैकी सनरायझर्स हैदराबाद संघातील टी नटराजन याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्याच्या संपर्कातील ६ व्यक्तींना पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा निकाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्याची सुरुवात होणार आहे.

मात्र नटराजन या सामन्याला मुकणार आहे. त्याला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्याबरोबर विजय शंकर यालाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कारण तो नटराजनच्या संपर्कात आला होता. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असूनही संघ व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

विजयबरोबर नटराजनच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये टीम मॅनेजर विजय कुमार, फिजिओ शाम सुंदर जे, डॉक्टर अंजना वनन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट बॉलर पेरियासामी गणेशन यांचा समावेश आहे.

आयपीएल २०२१ वर याआधीही ओढावलंय कोरोनाचं संकट
आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा भारतात खेळवण्यात आला होता. परंतु ४ मे रोजी ३१ सामने झाल्यानंतर उर्वरित हंगाम स्थगित करण्यात आला होता. यामागचे कारण होते, जैव सुरक्षित वातावरण असूनही खेळाडू आणि इतर सदस्यांचे कोरोना संक्रमित होणे. एका-नंतर-एक कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने तत्काळ बैठक बोलावत हा हंगाम स्थगित केला होता. परंतु पुढे युएईत राहिलेले २९ सामने खेळवण्याचे ठरवले गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्येही नाही मिळालं स्थान, युएईतील पहिल्याच सामन्यात ‘त्याने’ केला कहर 

विजयाच्या जल्लोषावर ‘विरजण’! पंजाबला धूळ चारल्यानंतर ‘या’ कारणामुळे संजूला १२ लाखांचा दंड

रोमहर्षक विजयासह राजस्थानची सरशी, तर पंजाब खालून दुसऱ्या स्थानी; पाहा गुणतालिकेची सद्यस्थिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---