कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल)च्या आठव्या हंगामाला १८ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. २० षटकांच्या या लीगमध्ये एकूण ३३ सामने खेळण्यात येणार आहेत. सीपीएलची सुरुवात गतवर्षी उपविजेता ठरलेल्या गयाना ऍमेझॉन वॉरियर्स विरुद्ध ट्रिनबागो नाइट रायडर्स संघातील सामन्याने होईल. या लीगचा अंतिम सामना १० सप्टेंबर रोजी खेळला जाईल. Live Telecast Of CPL 2020 In India All Details
विशेष म्हणजे, सीपीएल इतिहासात पहिल्यांदाच कोणता भारतीय क्रिकेटपटू खेळताना दिसेल. मुंबईचा ४८ वर्षीय फिरकीपटू प्रवीण तांबे सीपीएल २०२०मध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा भाग आहे.
सीपीएलमधील सर्व सामन्यांचे आयोजन मोकळ्या स्टेडिअममध्ये होणार आहे. टॉरूबामधील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये २३ सामने, तर पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडिअममध्ये एकूण १० सामने खेळले जाणार आहेत. उपांत्य आणि अंतिम सामने ब्रायन लारा स्टेडिअममध्ये होणार आहेत.
भारतीय प्रमाण वेळेनुसार होणार सामन्यांचे लाइव्ह टेलिकास्ट –
सीपीएल २०२०मध्ये डबल हेडर सामने (एका दिवशी दोन सामने) होणार आहेत. सोमवार ते शुक्रवार या दिवशी खेळला जाणारा पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता होईल. तर दूसरा सामना सकाळी ३ वाजता होईल. तसेच, आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी होणारा पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता आणि दूसरा सामना रात्री ११.३० वाजता सुरु होईल.
सीपीएल २०२० चा लाइव्ह टेलिकास्ट –
सीपीएल २०२० मधील सामन्यांचा लाइव्ह टेलिकास्ट भारतात ‘स्टार स्पोर्ट्स १ एचडी’ या टिव्ही चॅनेलवर पाहता येतील.
सीपीएल २०२० ऑनलाइन स्ट्रिमिंग –
सीपीएल २०२०चे ऑनलाइन स्ट्रिमिंग ‘हॉटस्टार’ या ऍपवर होणार आहे.
असे आहेत संघ
गयाना ऍमेझॉन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors)
इमरान ताहिर, निकोलस पूरन, ब्रेंडन किंग, रॉस टेलर, शिमरोन हेटमायर, क्रिस ग्रीन (कर्णधार), कीमो पॉल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमरियो शेफर्ड, नवीन उल हक, चंद्रपॉल हेमराज, केविन सिनक्लेर, एश्मेड नेड, ओडीन स्मिथ, एंथनी ब्राम्बले, जसदीप सिंग, किसोनडथ मैदरम.
जमैका तलावाह्ज (Jamaica Tallawahs)
आंद्रे रसल, संदीप लामिचाने, कार्लोस ब्रैथवेट, रोवमन पॉवेल (कर्णधार), मुजीब उर रेहमान, ग्लेन फिलिप्स, चैडविक वॉल्टन, ओशेन थॉमस, आसिफ अली, फिडेल एडवर्ड्स, जर्मन ब्लॅकवुड, प्रेस्टन मॅकविन, निकोलस किरटन, रमाल लुईस, नकरुमाह बोनर, वीरासमी पुर्मावू, रैनन परसौद.
सेंट लूसिया जोक्स (St Lucia Zouks)
डेरेन सॅमी (कर्णधार), रोस्टन चेज, मोहम्मद नबी, नजीबउल्लाह जादरान, आंद्रे फ्लैचर, केसरिक विलियम्स, स्कॉट कुजेलेजिन,चेमार होल्डर, ओबेड मैकॉय, रहकीम कॉर्नवॉल, मार्क देयल, जहीर खान, किमानी मेलियस, लेनिको बाउचर, कावेम हॉज, जेविल ग्लेन, साद बिन जफर.
ट्रिनबगो नाइट राइडर्स (Trinbago Knight Riders)
ड्वेन ब्रावो, कायरन पोलार्ड (कर्णधार), सुनील नरेन, कॉलिन मुनरो,फवाद अहमद, डेरेन ब्रावो, लेंडल सिमंस, खैरी पिएरे, टिम सिफर्ट, सिकंदर रजा, एंडरनसन फिलीप, प्रवीण तांबे, जेडन सील्स, आमिर जंगू, टायन वेबस्टर,अकील होसिन, मुहम्मद अली खान.
सेंट किट्स अँड नेविस पैट्रियट्स (St Kitts & Nevis Patriots)
क्रिस लिन, बेन डंक, एविन लुईस, निक कैली, सोहेल तनवीर, ईश सोधी, शेल्डन कॉटरेन, दिनेश रामदिन, रयाद एमरिट (कर्मधार), इमरान खान, अल्जारी जोसेफ, जोसुआ डी सिल्वा, डोमिनिक ड्रेक्स, कॉलिन अर्चीबेल्ड, जौं रस जगेसार, जमाहार हैमिल्टन.
बारबाडोस ट्रिडेंट्स (Barbados Tridents)
जेसन होल्डर (कर्णधार), राशिद खान, कोरी एंडरसन, शमारह ब्रूक्स, मिचेल सैंटनर, जॉनसन चार्ल्स, शाई होप, हेडन वॉल्श जूनियर, एश्ले नर्स, जॉनथन कार्टर, रेमन रीफर, काइल मेयर्स, जोसुआ बिशप, नयिम यंग, जस्टिन ग्रीव्स, कियोन हार्डिंग, शयन जहांगीर.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टोक्सच्या जागी या क्रिकेटरला मिळाली संधी
जर २०२१ विश्वचषक आयोजनाला भारत नाही म्हटला तर हे देश आहेत तयार
मुंबईचा ‘डेल स्टेन’ अशी ओळख असलेल्या क्रिकेटरची आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने आत्महत्या
ट्रेंडिंग लेख –
गेल, रसेल नव्हे तर या ३ फलंदाजांची सरासरी आहे टी२० मध्ये सर्वोत्तम
भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार
कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज