---Advertisement---

धक्कादायक! लिव्हरपूलला जर्मनीमध्ये येण्यास बंदी, ‘हे’ आहे कारण

On: शुक्रवार, फेब्रुवारी 5, 2021 5:35 PM
---Advertisement---

इंग्लंडमधील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब लिव्हरपूलला चॅंपियन्स लीगमधील सामना खेळण्यासाठी जर्मनीत येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे ही बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. जर्मन फुटबॉल क्लब आरबी लेपझिग व लिव्हरपूल यांच्या दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी हा सामना खेळविण्यात येणार होता.

जर्मनीत कडक केले नियम

मागील वर्षी कोरोना महामारीमुळे जगभरातील प्रवाशांना जर्मनीमध्ये येताच कडक नियमावलीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये फ्रान्स व इटलीपाठोपाठ जर्मनीत सर्वाधिक जीवितहानी झाली होती. त्यातच आता इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्याने, इंग्लिश नागरिकांविषयी जर्मनीमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच जर्मनीमध्ये लॉकडाऊन सुरु आहे.

त्रयस्थ ठिकाणाचा होऊ शकतो विचार

आरबी लेपझिग संघाने चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती. त्यातील लिव्हरपूलविरुद्धचा पहिल्या लेगचा सामना लेपझिगला आपल्या घरच्या मैदानावर खेळावा लागणार आहे. मात्र, सरकारने परवानगी न दिल्यास त्रयस्थ ठिकाणाचा विचार केला जाऊ शकतो. आरबी लेपझिग संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओलिवर मिंटलाफ यांनी म्हटले की, “आमची या गोष्टीवर चर्चा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने काय होईल का याविषयी काम देखील करतो आहोत. आम्ही कोठे तरी हा सामना खेळणारच आहोत.”

उभय संघांमध्ये दुसऱ्या लेगचा सामना १० मार्च रोजी लिव्हरपूलचा घरच्या मैदानावर होईल. आरबी लेपझिगचा सहयोगी संघ असलेल्या ऑस्ट्रीयन क्लब आरबी साल्झबर्गच्या रेड बुल एरीना मैदानावर हा सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर सामन्यांवरही टांगती तलवार

आरबी लेपझिग व लिव्हरपूल यांच्यातील सामन्यात व्यतिरिक्त जर्मनीत होणाऱ्या दुसऱ्या सामन्यावरही रद्द होण्याची टांगती तलवार आहे. चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या बोरूशिया मोन्चेनग्लॅडबाक व मँचेस्टर सिटी यांच्यातील सामना २४ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

शारापोवा आम्हाला माफ कर, तू सचिनबाबत जे बोलत होतीस ते बरोबर होतं, पाहा का मागितली चाहत्याने टेनिस स्टारची माफी

ब्रेकिंग! प्रसिद्ध फुटबॉलपटू आंद्रे ओन्नावर एका वर्षाची बंद, हे आहे कारण   

INDvsENG 1st Test: पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ३ बाद २६३ धावा, कर्णधार जो रूट शतकासह नाबाद; बुमराहच्या २ विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---