इंग्लिश प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल संघ आणि त्याच्या भोवतालचे वलय खूप मोठे आहे. या संघाने फुटबॉल विश्वाला खूप मोठे खेळाडू दिले आहेत. या संघाची मागील काही सामन्यातील कामगिरी खूप खराब झाली आहे. या संघाने मागील सहा सामन्यामध्ये फक्त २ वेळा १ पेक्षा जास्त गोल केला आहे. त्यामुळे या संघावर आणि प्रशिक्षक जुर्गेन क्लॉप यांच्यावर टीका होत आहे.
जुर्गेन क्लॉप या सर्व टीकानंतरही आपल्या संघातील खेळाडूंच्या पाठीशी उभे आहेत. त्यांना स्ट्रायकर म्हणून कोणी नवीन खेळाडू नको असून संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर पूर्ण भरोसा आहे. बाकीचे संघ उदाहरणार्थ मँचेस्टर युनाइटेड आणि चेल्सी यांनी या वर्षी मोठी रक्कम देऊन नवीन स्ट्रायकर घेऊन गोलचा धडाका लावला आला.
मँचेस्टर युनाइटेडचा स्ट्रायकर रोमुलू लुकाकूने मागील ९ सामन्यात १० गोल केले आहेत तर चेल्सीच्या अल्वारो मोराटाने मागील ६ सामन्यात ५ गोल केले आहेत. या मोसमात लिव्हरपूल संघाने कोणत्याही मोठ्या खेळाडूला करारबद्ध केले नाही. प्रशिक्षकांनी डॅनियल स्टेरीज, रॉबेर्टो फिरमिंगो आणि डॅनिमिक सोलंकी या खेळाडूंवरच प्रशिक्षकांनी भरोसा दाखवला आहे.
एखाद्या मोठ्या खेळाडूला का स्ट्रायकर म्हणून संघाने करारबद्ध केले नाही,या प्रश्नाचे उत्तर देताना क्लॉप म्हणाले, मागील सामन्यात आम्ही काही गोल करण्याच्या संधी दडवल्या असल्या तरी संघाकडे असणारे फॉरवर्ड हे त्यांच्या जागेवर एकदम फिट आहेत. डॅनियल स्टेरीज दुखापतीतून सावरून तंदरुस्त आहे. डॅम सोलंकी हा इंग्लिश फुटबॉल मधील सर्वोत्तम तरुण खेळाडू आहे. रॉबेर्टो फिरमिंगो याने जरी मागील मोसमात २५ गोल केले नसले तरी तो प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या सर्वोत्तम स्ट्रायकरपैकी एक आहे.”
पुढे ते म्हणाले की, मला मान्य आहे संधी दडवल्या गेल्या पण अन्य कोणत्याही खेळाडूने देखील संधी दडवल्या असत्या. कदाचित तुम्ही म्हणाल हॅरी केन याने गोल केले असते. हे सत्य आहे कदाचित त्याने गोल केले असतेच. परंतु अन्य कोणत्याक्षणी तो देखील गोल ठरतोच.