येत्या काही दिवसात आयपीएल (IPL) २०२२ स्पर्धेचा मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावापूर्वी सर्व ८ संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले होते. सर्व संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने व्यंकटेश अय्यर, सुनील नरीन, वरूण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल या खेळाडूंना रिटेन केले आहे. दरम्यान याच संघातून रिलीज करण्यात आलेल्या आलेल्या न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूने पुन्हा एकदा या संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.(ipl 2022)
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight riders) संघाने आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंना रिलीज केले आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे न्यूझीलंड संघाचा दिग्गज खेळाडू लॉकी फर्ग्युसन (lockie Ferguson). त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने रिटेन केले नाहीये. परंतु त्याने पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.(Lockie Ferguson Statement)
लॉकी फर्ग्युसनने ॲमेजॉन प्राईमद्वारे प्रदर्शित करण्यात आलेल्या टेलिग्राफमध्ये म्हटले की, “एक खेळाडू म्हणून ३ वर्ष कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळणे, खूप चांगला अनुभव होता. मी दबाव कसा कमी करायचा हे शिकलो. त्यामुळे एक खेळाडू म्हणून मी खूप काही शिकलो आहे. मला वाटते की, आयपीएलमुळे मला खूप मदत झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघात जाणं हा त्यातीलच एक भाग आहे.”
हे वाचा : गौतम गंभीरनंतर लखनऊ संघाचा भाग बनला ‘हा’ भारतीय दिग्गज, सहाय्यक प्रशिक्षकपदी झालीय नियुक्ती
तसेच तो पुढे म्हणाला की, “लवकरच लिलाव सुरू होणार आहे. अर्थातच मला कोलकाता नाईट रायडर्स संघात जायला आवडेल. मला त्यांच्यासह लोकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खेळायला आवडतं. ब्रेंडन मॅक्युलम हे अपवादात्मक होते आणि ज्या पद्धतीने फ्रँचायझी चालवली जाते ती देखील अपवादात्मक आहे.” लॉकी फर्ग्युसनला कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०१९ मध्ये झालेल्या लिलावात १.६ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते.
लहान मुलांचे अश्लील फोटो स्वतःजवळ ठेवायचा ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, आता झालाय ४ वर्षांचा तुरुंगवास
Video: लाईव्ह सामन्यातील ‘ब्रोमान्स’ची इंटरनेटवर तुफान चर्चा, कर्णधाराचे मैदानातच गोलंदाजाला किस
हे नक्की पाहा :