इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर चहूबाजूंनी भारतीय संघातील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान लॉर्ड्स ग्राउंडकडूनही विराट सेनेला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या अधिकृत सोशल मीडिया हँडेलद्वारे विराट सेनेला शुभेच्छा दिल्या आहेत.
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडचे सोशल मीडिया अकाऊंट प्रचंड सक्रिय असते. ते नेहमी ग्राऊंडवर होणाऱ्या सामन्यांचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी विराट सेनेला शुभेच्छा देत,”विजय मिळवल्याबद्दल तुझे अभिनंदन विराट” असे लिहिले आहे.(Lord’s cricket ground appreciated Indian team victorya at lord’s)
Congratulations on your victory, Virat ????#LoveLords
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) August 16, 2021
शमी – बुमराहने करून दिले पुनरागमन
सामन्याच्या पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट)या सामन्यात इंग्लंडचे पारडे जड होते. असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना गमावणार. परंतु, रिषभ पंत आणि ईशांत शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी संपूर्ण सामन्याचे समीकरण बदलून टाकले. दोघांनी मिळून इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले.
मोहम्मद शमीने या डावात तुफानी अर्धशतक झळकावत नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावांची खेळी. दोघांनी मिळून नाबाद ८९ धावांची भागीदारी केली. भारतीय संघाने दुसरा डाव २९८ धावांवर घोषित केला. तसेच इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी २७२ धावांचे आव्हान दिले होते.
दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांचा बोलबाला
भारतीय संघाने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांना फार काळ टिकता आले नाही. दोघेही भोपळाही न फोडता माघारी परतले होते. त्यानंतर पहिल्या डावात शतक झळकावणारा कर्णधार जो रूट याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो देखील या डावात मोठी खेळी करू शकला नाही. तो ३३ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
शेवटी जोस बटलरने एकहाती झुंज दिली. परंतु, ही झुंज देखील अपयशी ठरली. तो २५ धावा करत तंबूत परतला होता. इंग्लंडचा संपूर्ण डाव १२० धावांवर संपुष्टात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –






