पुणे, 7 फेब्रुवारी 2024: इंटेंसिटी टेनिस अकादमी व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए इंटेंसिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानांकन(12वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात क्वालिफायर लव परदेशी याने दुसऱ्या मानांकित तक्षिल नगरचा 6-1, 4-6, 6-1 असा पराभव करून आपली सनसनाटी निकालाची मालिका कायम ठेवली.
खराडी कपिला रिसॉर्ट येथील इंटेंसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित आरव बेले याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या आदिनाथ कचरेचा 6-0, 6-2 असा सहज पराभव केला. सातव्या मानांकित लक्ष्य त्रिपाठीने शौर्य गडदेला 6-1, 6-3 असे पराभूत केले. तिसऱ्या मानांकित सोलापूरच्या यशवंतराजे पवारने सहाव्या मानांकित अद्वैत गुंडचा 5-7, 6-3, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित वैदेही शुक्लाने रिशीता यादवचे आव्हान 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मानांकित नक्षत्रा अय्यरने देविका पिंगेला 6-2, 6-0 असे नमविले.
मनस्वी राठोडने चाहत ठाकूरचा 6-1, 6-3 असा तर, पाचव्या मानांकित जान्हवी सावंतने देवेशी पडियाचा 7-5, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित ख्याती मनीष व हर्षिका सिंग यांनी कायरा मानकर व स्वर्णिका ढमाले यांचा 6-0, 3-6, 11-9 असा पराभव करून आगेकूच केली. (Love Pardeshi beats Takshil Nagar in All India Ranking Championship Series tennis tournament)
निकाल: दुसरी फेरी: मुले:
आरव बेले(1)वि.वि.आदिनाथ कचरे 6-0, 6-2;
लक्ष्य त्रिपाठी(7) वि.वि.शौर्य गडदे 6-1, 6-3;
यशवंतराजे पवार(3)वि.वि.अद्वैत गुंड(6) 5-7, 6-3, 6-1;
लव परदेशी वि.वि.तक्षिल नगर(2) 6-1, 4-6, 6-1;
मुली:
वैदेही शुक्ला(1)वि.वि.रिशीता यादव 6-3, 6-3;
मनस्वी राठोड वि.वि.चाहत ठाकूर 6-1, 6-3;
जान्हवी सावंत(5)वि.वि.देवेशी पडिया 7-5, 6-1;
नक्षत्रा अय्यर(2)वि.वि.देविका पिंगे 6-2, 6-0;
दुहेरी: मुली: उपांत्यपूर्व फेरी:
नक्षत्रा अय्यर/वैदेही शुक्ला(1) वि.वि.सान्वी गोसावी/चाहत ठाकूर 6-0, 7-6(0);
देवेशी पडिया/देविका पिंगे(4) वि.वि.स्वरा पवार/शरण्या सावंत 4-6, 6-3, 10-8;
जान्हवी सावंत/अस्मी पित्रे(3)वि.वि.सान्वी लाटे/समायरा ठाकूर 6-2, 6-1;
ख्याती मनीष/हर्षिका सिंग(2)वि.वि.कायरा मानकर/स्वर्णिका ढमाले 6-0, 3-6, 11-9;
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेचे 10 फेब्रुवारीपासून आयोजन
18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत व्हेरिटास, यार्डी, टेक महिंद्रा संघांचे विजय