दहा वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात त्यावेळचा भारतीय कर्णधार एमएस धोनीने मारलेला विजयी षटकार आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे. या षटकाराचे कौतुक अनेक खेळाडूंनीही केले आहे.
आता विश्वविजेत्या इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने म्हटले आहे की, माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शांत स्वभावामुळे आणि प्रतिभेमुळे तो मनापासून प्रभावित झाला आहे. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धोनीने मारलेला षटकार बटलरला खूप पसंत आहे, ज्याद्वारे भारतीय संघाने 28 वर्षांनंतर विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरल होतं.
बटलर क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, “मला धोनीचा तो शॉट खूप आवडतो, जेव्हा धोनीने 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात षटकार ठोकला होता. धोनीने ज्या पद्धतीने बॅट फिरवली ते खरोखरच सर्वात प्रेक्षणीय होते. तो क्षण भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा क्षण होता. मला त्याला (धोनीला) खेळताना पाहणे आवडते.”
बटलर पुढे म्हणाला, “मला धोनीची काम करण्याची पद्धत आवडते, कारण ती त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. असे नाही वाटत की तो या बाबतीची काळजी करतो की आपण कशा प्रकारे खेळत आहोत.”
बटलरने धोनीच्या यष्टीमागील वेगाचे देखील कौतुक केले आहे. तो म्हणाला, “यष्टीरक्षक म्हणून त्याच्याकडे विजे सारखे वेगवान हात आणि चपळाई आहे. काहीवेळा तो अशा प्रकारे खेळतो की प्रशिक्षक म्हणेल हे तांत्रिक दृष्ट्या योग्य नाही. पण ज्याप्रमाणे त्याचे हात काम करतात हे विलक्षण आहे ”
तसेच बटलरने मुलाखतीदरम्यान 1999 च्या भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या विश्वचषक सामन्याची आठवण सांगितली आहे. ज्या सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी शतक ठोकले होते. टॉन्टन काउंटी मैदानावर हा सामना खेळला गेलेला होता. त्या सामन्यात अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या श्रीलंकेचा भारतीय संघाने 157 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.
बटलर म्हणाला, ‘ती माझी आवडती वर्षे होती. त्या सामन्यात द्रविड आणि गांगुलीच्या शतकाचा माझ्यावर मोठा परिणाम झाला होता. त्या सामन्यात मी प्रथमच भारतीय चाहत्यांमधील क्रिकेटची आवड बघितली होती. मग मी विचार केला की भारतात विश्वचषक खेळणे किती उत्साहवर्धक असेल.’
महत्त्वाच्या बातम्या –
मागील वर्षी अंतिम ११ मधून वगळण्यात आल्याबद्दल पुन्हा एकदा ब्रॉडने केले मोठे भाष्य; म्हणाला…
बीसीसीआयने पाळला दिलेला शब्द; अजूनही उचलत आहेत ‘त्या’ खेळाडूंचा खर्च
इंग्लंडची खेळाडू डॅनियल वॅटच्या लग्नाच्या प्रस्तावावर विराटच्या आईने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया