पुणे २० जुलै २०२३ – सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघाने पुन्हा एकदा वर्चस्वपूर्ण खेळाचे प्रदर्शन करताना आंतरशालेय लॉयला कप फुटबॉल स्पर्धेत तीनही गटात विजय मिळविला. सी.एम. इंटरनॅशनल प्रशाला संघानेही दोन विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली.
टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात सम्यक भंडारेच्या तीन गोलच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट संघाने कल्याणी प्रशाला संघावर ७-० असा विजय मिळविला. आयुष रचलूतुमनी, अंश लोढाने एकेक, अॅन्वीक लोबोने दोन गोल केले. सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघाने त्यानंतर १४ वर्षांखालील गटात कल्याणी प्रशाला संघावरच ४-० असा विजय मिळविला. नील जगदाळे, अॅरॉन बाबेन, इथान लोबो, हसन ईस्माईल यांनी अन्य गोल केले. दोन पराभवानंतर कल्याणी प्रशाला संगाने १६ वर्षांखाली गटात मात्र सेंट व्हिन्सेंट संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. कल्याणी प्रशालेसाठी जय कोरो आणि सेंट व्हिन्सेंट प्रशालेसाठी एडन अॅम्ब्रोसने गोल केले.
स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात सी.एम. इंटरनॅशनल प्रशाला संघाने आपली छाप पाडताना १६ वर्षांखालील गटात श्यामराव कलमाडी प्रशाला संघाचा ६-४ असा पराभव केला. विजयी संघाकडून अव्यक्त गुरुवेल्लीनेच सहाही गोल केले. कलमाडी प्रशाला संघाकडून देखील चारही गोल तनिश आयाचितने केले. त्यानंतर सी.एम. इंटरनॅशनल संघाने १२ वर्षांकालील गटात श्यामराव कलमाडी प्रशाला संघाचा ५-० असा पराभव वकेला. सी.एम. इंटरनॅशनल संघाकडून पी. कार्तिकेयने चार, तर वियान चोप्राने एक गोल केला. (Loyola Cup Football. Undisputed dominance of St. Vincent’s, CM International also progressed)
निकाल –
१२ वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला ७ (आयुष रचालुटुनी १५ वे मिनिट, अंश लोढा १८वे मिनिट, अॅन्विक लोबो २०वे, ३६वे मिनिट, सम्यक भंडारे २३, २४, ३८वे मिनिट) वि.वलि. कल्याणी स्कूल ०
सी.एम. इंटरनॅशनल स्कूल ५ (पी. कार्तिकेय १०, १३, २६, २८वे मिनिट, वियान चोप्रा १२वे मिनिट) वि.वि. श्यामराव कलमाडी प्रशाला ०
१४ वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला ४ (नील जगदाळे २९वे, अॅरॉन बाबेन ४५वे, इथान लोबो ४७वे, हसमन ईस्माईल ५०वे मिनिट) वि.वि. कल्याणी स्कूल ०
श्यामराव कलमाडी प्रशाला ३ (शिव रोकडे ८वे, आरव बराटे ३१वे मिनिट) वि.वि. सी.एम. इंटरनॅशनल स्कूल १ (वत्सल कुकाडिया १५वे मिनिट)
१६ वर्षांखालील – सेंट व्हिन्सेंट प्रशाला १ (एडन अॅम्ब्रोस १०वे मिनिट) बरोबरी वि. कल्याणी स्कूल १ (जय कोरो ३रे मिनिट)
सी.एम. इंटरनॅशनल स्कूल ६ (अव्यक्त गुरुवेल्ली १३, ३५, ४०, ४३, ४५, ४८वे मिनिट) वि.वि. श्यामराव कलमाडी प्रशाला ४ (तनिश आयाचित ७, ९, ३१, ५०वे मिनिट)
महत्वाच्या बातम्या –
WIvIND: दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची प्रथम फलंदाजी! मुकेश कुमारचे पदार्पण, विराटचा 500 वा सामना
पंतच्या फिटनेसविषयी मोठी अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाला विश्वचषकात खेळायचाय, वेटलिफ्टिंगला केली सुरुवात