लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव केला. लखनऊ सुपर जायंट्ससमोर 191 धावांचे लक्ष्य होते. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने केवळ 16.1 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयानंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका आनंदाने उड्या मारत होते. त्यांनी कर्णधार रिषभ पंतला मिठीही मारली. आता संजीव गोएंका आणि रिषभ पंत यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
डेव्हिड मिलरने विजयी फटका मारताच, संजीव गोयंका आनंदाने उड्या मारत होते. यानंतर संजीव गोयंका यांनी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतला मिठी मारली. त्यांनी लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक झहीर खान आणि इतर प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली. यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात, संघ विजयाच्या उंबरठ्यावर असूनही हरले. त्यानंतर संजीव गोयंका यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. पण यावेळी लखनऊ सुपर जायंट्सच्या खेळाडूंनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध निराश केले नाही.
Sanjiv Goenka gives a tight hug to Rishabh Pant. pic.twitter.com/yHcnCCmxXP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 27, 2025
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या. ज्यात सनरायझर्स हैदराबादकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 28 चेंडूत सर्वाधिक 47 धावा केल्या. याशिवाय अनिकेत वर्मा 13 चेंडूत 36 धावा काढून बाद झाला. लखनऊ सुपर जायंट्सकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
सनरायझर्स हैदराबादच्या 191 धावांच्या प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सने 16.1 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. लखनऊ सुपर जायंट्सकडून निकोलस पूरनने 26 चेंडूत सर्वाधिक 70 धावा केल्या. याशिवाय मिचेल मार्शने 31 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले.