---Advertisement---

IPL 2025: निकोलस पूरनचा तुफानी षटकार, चाहत्याच्या डोक्याला लागली बॉल VIDEO VIRAL

On: रविवार, एप्रिल 13, 2025 3:06 PM
---Advertisement---

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चा स्टार फलंदाज निकोलस पूरने शनिवारी, 12 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध एकना स्टेडियमवर शानदार अर्धशतक झळकावले. पूरनने फक्त 34 चेंडूंमध्ये 61 धावा ठोकल्या, ज्यात 1 चौकार आणि तब्बल 7 षटकारांचा समावेश होता.

पूरनचा एक जबरदस्त षटकार थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन लागला आणि एक तरुण चाहत्याच्या डोक्याला लागला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचार दिल्यानंतर तो सुखरूप परतला. विशेष म्हणजे, नंतर तो चाहताही टीमच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या शानदार खेळीमुळे निकोलस पूरणने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप मिळवली आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या ओपनर्स साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी 12 षटकांत 120 धावांची भागीदारी केली. पण लखनऊने नंतर जोरदार पुनरागमन करत शेवटच्या 8 षटकांत फक्त 60 धावा दिल्या आणि 6 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात, एडन मार्करामने फटकेबाजी करत 31 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या. पंतनेही 21 धावा केल्या. मिचेल मार्श आपल्या मुलीच्या आजारामुळे अनुपस्थित होता.

शेवटी, पूरनच्या स्फोटक खेळीमुळे आणि अयुष बदोनी व अब्दुल समद यांच्या संयमित फलंदाजीमुळे लखनऊने सामना 3 चेंडू राखून जिंकला.

लखनऊ सुपर जायंट्सने आता सलग तीन सामने जिंकले असून ते गुणतालिकेत 3ऱ्या स्थानी पोहोचले आहेत. गुजरात टायटन्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---