आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (२९ एप्रिली) लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जला पराभूत केले. या विजयानंतर लखनऊने गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबादला पछाडले आणि तिसरा क्रमांक पटकावला. पंजाब किंग्जला विजय मिळवून देण्यासाठी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे पूर्ण प्रयत्न केला, पण असे होऊ शकले नाही. असे असले, तरी रबाडाने या सामन्यादरम्यान मोठी कामगिरी केली आहे.
भेदक गोलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) या सामन्यात चार खेळाडूंना तंबूत पाठवले. हा रबाडाच्या आयपीएल कारकिर्दीतील ५८वा सामना असून यामध्ये त्याने खास विक्रमाची नोंद केली आहे. रबाडा आता आयपीएलमधील स्वतःच्या सुरुवातीच्या ५८ सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल कारकिर्दीत सुरुवातीच्या ५८ सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत आता रबाडाचे नाव सर्वात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. रबाडाने श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. मलिंगाने त्याच्या पहिल्या ५८ आयपीएल सामन्यात ८५ विकेट्स घेतल्या होत्या. रबाडा आता ८९ विकेट्सह पहिल्या क्रमांकावर आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघाचाच इमरान ताहीर आहे. इमरानने त्याच्या सुरुवात्या ५९ आयपीएल सामन्यात ८० खेळाडूंना तंबूत धाडले होते. यादीत चौथ्या क्रमांकावर ७७ विकेट्ससह वेस्ट इंडीजचा फिरकीपटू सुनील नरेन आहे. पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोंलंदाज ट्रेंट बोल्टचे नाव आहे, ज्याने यादरम्यानच्या काळात ७४ विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय वेगवान गोलंदाज संदीप शर्मा सहाव्या क्रमांकावर आहे, ज्याने आयपीएमधील सुरुवातीच्या ५८ सामन्यात ७४ बळी घेतले होते. संदीप या यदीत सर्वोत्तम आकडे असणाऱ्यांमध्ये एकमेव भारतीय देखील ठरला आहे.
दरम्यान, लखनऊ आणि पंजाबमध्ये शुक्रवारी खेळला गेलेला हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर पार पडला. यामध्ये पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून लखनऊला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ८ विकेट्सच्या नुकसानावर १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबला हे लक्ष्य गाठता आले नाही. त्यांचा संघ १३३ धावांपर्यंत; मजल मारू शकला. यादरम्यान पंजाब किंग्जने ८ विकेट्स गमावल्या.
पहिल्या ५८ आयपीएल सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
८९ – कागिसो रबाडा*
८५ – लसिथ मलिंगा
८० – इमरान ताहीर
७७ – सुनील नरेन
७४ – संदीप शर्मा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोलकाताला धूळ चारल्यानंतर वॉर्नरने पत्नीसोबत ठुमके लावत साजरा केला आनंद; पोरींनीही दिली साथ