सोमवारी (०४ एप्रिल) आयपीएल २०२२चा बारावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय रोमांचक राहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात लखनऊने १२ धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा हंगामातील दुसरा विजय होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने निर्धारित २० षटकांमध्ये १६९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांनी ७ विकेट्सही गमावल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाला २० षटकांमध्ये ९ विकेट्च्या नुकसानावर १५७ धावाच करता आल्या.
लखनऊच्या १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ४४ धावा फटकावल्या. ३० चेंडू खेळताना त्याने १ षटकार आणि ५ चौकार मारत या धावा जोडल्या. तसेच यष्टीरक्षक निकोलस पूरनने ३४ धावांचे योगदान दिले. मात्र शेवटच्या षटकात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. संघ विजयाच्या नजीक असताना तो १८ धावांवर बाद झाला.
Brilliant bowling performance by #LSG as they defend their total of 169/7 and win by 12 runs 👏👏
Scorecard – https://t.co/89IMzVls6f #SRHvLSG #TATAIPL pic.twitter.com/MY2ZhM3Mqe
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2022
या डावात लखनऊकडून आवेश खानने शानदार गोलंदाजी केली. त्याने २४ धावा खर्च करत हैदराबादच्या ४ फलंदाजांना बाद केले. तसेच कृणाल पंड्यानेही मधल्या फळीत संघाला महत्त्वपूर्ण विकेट्स संघाला मिळवून दिल्या. याखेरीज शेवटच्या निर्णायक षटकात जेसन होल्डरने अप्रतिम गोलंदाजी करताना २ विकेट्स घेतल्या आणि संघाला विजयी शेवट करून दिला.
तत्पूर्वी लखनऊकडून केएल राहुलने कर्णधार खेळी केली होती. एका बाजूने झटपट विकेट्स जात असताना त्याने ५० चेंडूंमध्ये ६८ धावांची झुंजार खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने १ षटकार आणि ६ चौकारही मारले होते. त्याच्या साथीला दीपक हुडानेही धुव्वादार अर्धशतक केले होते. ३३ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ३ चौकार मारत महत्त्वपूर्ण ५१ धावा केल्या होत्या. हे त्याचे लखनऊ संघाकडून दुसरे अर्धशतक आहे, तर आयपीएल कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक आहे. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनऊचा संघ १६९ धावांचा पल्ला गाठू शकला होता.
या डावात हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरिओ शेफर्ड आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट ११ क्रिकेटर, एकाही भारतीय खेळाडूचा नाही समावेश
केकेआरचा अष्टपैलू वेंकटेश अय्यरने अंडरटेकरची करून दिली आठवण, फोटोग्राफरला मारला ‘चोकस्लॅम’
लखनऊच्या घातक सलामीवीराला बाद करण्यासाठी केनचा ‘ice-cool’ कॅच, विजेच्या वेगाने टिपला झेल