आयपीएल 2025 मधील तेरावा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना लखनऊच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच लखनऊ संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. लखनऊ ने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या. आता पंजाबला जिंकण्यासाठी 172 धावांचं आव्हान दिलेलं आहे.
लखनऊसाठी प्रथम फलंदाजी करताना संघासाठी सर्वोत्तम धावा निकोलस पुरण (44) आणि बडोनी (41) यांनी केल्या.
एडन माक्रमने 18 चेंडूत 28 धावा, मिलर 18 चेंडूत 19 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत अवघ्या दोन धावांवर परत गेला तो आज काही खास कामगिरी करू शकला नाही.
पंजाब साठी सर्वोत्तम गोलंदाजी अर्शदीप सिंगने केली. त्याने चार षटकात 41 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. बाकी गोलंदाजांनी एक- एक विकेट्स घेतल्या.