इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम लवकरच सुरू होत असून या आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळताना दिसणार नाहीत, त्यांपैकीच एक म्हणजे मार्क वूड. कोपराला दुखापत झाल्यामुळे मार्क वूड आयपीएलच्या आगामी हंगामात खेळताना दिसणार नाही. तो आता बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, सॅम करन, जेसन राॅय आणि एलेक्स हेल्स यांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. हे खेळाडू यंदाची आयपीएल खेळताना दिसणार नाहीत. वूड हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. आता त्याच्या बदलीमध्ये दुसरा खेळाडू शोधणे संघासाठी कठीण जाऊ शकते. जर लखनऊ संघ व्यवस्थापनाने काही गोलंदाजांवर लक्ष्य दिले, तर त्याच्याऐवजी दुसरा खेळाडू मिळू शकतो. या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात, ज्यांना वूडऐवजी संघात स्थान मिळू शकते.
१. ब्लेसिंग मुजरबानी (Blessing Muzarabani)
मेगा लिलावात ब्लेसिंग मुजरबानीने आपली मूळ किंमत ५० लाख एवढी ठेवली होती. या खेळाडूने पाकिस्तान सुपर लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने मुलतान सुलतान संघाकडून खेळताना ४ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २४.६८ च्या सरासरीने २० सामन्यांत २५ विकेट्स घेतल्या आहेत. खेळपट्टीवर मोठ्या उपलब्धी मिळवण्यात तो यशस्वी होतो. या खेळाडूला मार्क वूडच्या जागी संघात स्थान दिले जाऊ शकते.
२. अली खान (Ali Khan)
अली खान हा खेळाडू २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत जोडला गेला होता, परंतु तो दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला. तो आत्तापर्यंत गयाना अमेझॉन वाॅरियर्स, काबूल जवानन, खुलना टायटन्स, कराची किंग्स, इस्लामाबाद युनायटेड या संघासाठी खेळला आहे. त्याच्याकडे खूप अनुभव आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेला हा खेळाडू आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करू शकतो.
३. जेडन सील्स
जेडन सील्सने आयपीएल लिलावात आपली मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली होती. त्याच्यावर कोणत्याच संघाने बोली लावली नाही. तो सध्या इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या कसोटीमध्ये शानदार कामगिरी करत आहे. त्याने आपल्या पहिल्या ५ कसोटींमध्ये २० विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिज प्रीमियर लीगमध्ये तो त्रिनबॅगो नाईट रायडर्स आणि लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्ससाठी खेळत आहे. या खेळाडूला संघात घेण्याबाबत लखनऊ संघ विचार करू शकतो.
४. जोश लिटल (Josh Little)
जोश लिटल या वर्षी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. परंतु तो लखनऊमध्ये गेला, तर त्याला एका बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये पाठवले जाईल. त्याने २०१६ मध्ये टी२० मध्ये पदार्पण केले होते. त्याने ३४ सामन्यांत ३१ विकेट्स घेतल्या आहेत. तो लंका प्रीमियर लीगमध्ये दांबुला जायंट्स संघाकडून खेळला आहे.
५. एँड्र्यू टाय
एँड्र्यू टायने २०२०च्या आयपीएलमध्ये एकच सामना खेळला होता. या लिलावात त्याच्यावर कोणत्याच फ्रॅंचायझीने बोली लावली नव्हती. त्याने २७ सामन्यांत ४० विकेट्स घेतल्या आहेत. २०१८ चा तो पर्पल कॅप विजेता गोलंदाज आहे. त्याने १४ सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत. तो बिग बॅश लीगमध्ये तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्ज ठरणार नवीन आयपीएल चॅम्पियन? संघाचा नवा कर्णधार मयंक अगरवाल म्हणतोय…
वाढदिवस विशेष : कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे ‘मदन लाल’






