आयपीएलचा पहिला हंगाम खेळणारे संघ लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मंगळवारी (१० मे) या दोन्ही संघांचा आमना सामना झाला. गुजरातने या सामन्यात तब्बल ६२ धावांच्या अंतराने लखनऊला मात दिली. लखनऊला मिळालेल्या पराभवानंतर त्यांचा मेंटॉर आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर चांगलाच निराश झाला. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये त्याने खेळाडूंना धारेवर धरले. लखनऊ सुपर जायंट्सच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
लखनऊ संघाचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना म्हणाला की, “हारण्यामध्ये काहीही हरकत नाहीये. क्रिकेटमध्ये एक संघ हारतो, तर दुसरा जिंकतो. पण आपण गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारला आहे. आपण आजच्या सामन्यात खूप कमजोर होतो आणि आयपीएलसारख्या स्पर्धेत कमजोरांना कुठेच स्थान नाहीये. आपण याआधीही चांगले क्रिकेट खेळले आहे आणि चांगल्या संघांवर मात केली आहे. पण आजचा सामना पाहून वाटले की, आपल्याकडे काहीच गेम सेंस नाव्हता.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गंभीरने पुढे बोलताना संघातील गोलंदाजांचे मात्र कौतुक केले. तो म्हणाला की, “गुजरातने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली, यात काहीच शंका नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या गोलंदाजांकडून अशीच अपेक्षा असते. आपण अशाप्रकारच्या आव्हानांसाठीच दिवस रात्र सराव करत असतो. अशात आपल्याला यातून धडा घ्यावा लागेल.”
https://www.instagram.com/p/CdZKhChsmS8/
दरम्यान, उभय संघातील या सामन्यावर एक नजर टाकली, तर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजराने ४ विकेट्सच्या नुकसानावर १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्स हे लक्ष्य सहज गाठेल, अशी अपेक्षा होती, पण त्यांना ते जमले नाही. राशिद खानने घेतलेल्या चार विकेट्समुळे लखनऊचा संघ १३.५ षटकांमध्ये ८२ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी गुजरात टायटन्सने ६२ धावांनी सामन्यात विजय मिळवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आपल्या खराब फॉर्मबद्दल पहिल्यांदाच बोलला विराट; गोल्डन डकविषयी म्हणाला, ‘खूप असहाय…’
क्रिकेटसाठी दररोज २५ किमी सायकलने पार करायचा ‘हा’ गोलंदाज, आता बनलाय पंजाब किंग्जचा हुकुमी एक्का