पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर संपुष्टात आला आहे.
त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला असून भारताने तिसऱ्याच षटकात मुरली विजयची विकेट गमावली आहे. विजय तिसऱ्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एकही धाव न करता बाद झाला. त्याला आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्रिफळाचीत केले.
पहिले सत्र संपले तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात 3 षटकात 1 बाद 6 धावा केल्या आहेत. तसेच केएल राहुल 1 धावेवर नाबाद आहे.
तत्पूर्वी आॅस्ट्रेलियाने आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात 6 बाद 277 धावांपासून सुरु केली होती. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्स यांनी सुरुवातीला चांगला खेळ केला. पण उमेश यादवने 19 धावांवर खेळणाऱ्या कमिन्सला त्रिफळाचीत केले.
त्याच्या पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पेनला पायचीत बाद करत आॅस्ट्रेलियाची आठवी विकेट घेतली. पेनने 38 धावा केल्या. यानंतर इशांत शर्माने 109 व्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर जोश हेजलवूड आणि मिशेल स्टार्कला बाद करत आॅस्ट्रेलियाचा डाव 108.3 षटकात 326 धावांवर संपुष्टात आणला.
आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अॅरॉन फिंच(50), मार्क्यूस हॅरिस(70) आणि ट्रेविस हेड(58) यांनी अर्धशतके केली.
भारताकडून जसप्रीत बुमराह(2/53), इशांत शर्मा(4/41), हनुमा विहारी(2/53) आणि उमेश यादव(2/78) यांनी विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: सुपरमॅन कोहलीचा हा अफलातून झेल पाहिला का?
–१९९० नंतर टीम इंडियाच्या बाबतीत केवळ चौथ्यांदाच घडले असे काही…
–विराट कोहलीचे टेन्शन वाढले, चांगली कामगिरी केली नाही तर…