पुणे, १५ डिसेंबर २०२३: पीसीएमसी हॉकी अकादमी, मध्य रेल्वे पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या एम जे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील (पुरुष आणि महिला) आपापल्या पहिल्या गटातील सामन्यात विजय मिळवला आणि पूर्ण गुण मिळवले.
धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पीसीएमसी हॉकी अकादमीने साखळी अ गटामध्ये यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमीचा ०-१ असा पिछाडीवरून ३-१ असा पराभव केला. पेनल्टी स्ट्रोकवर सौरभ पाटील (३५वा), पेनल्टी कॉर्नरवर जय काळे (३८वा) आणि अभिषेक माने (५७वा) यांचा प्रत्येकी एक गोल पीसीएमसीच्या विजयासाठी पुरेसा ठरला. एक्सलन्सी हॉकी अकादमीसाठी नवज्योत सिंग (सहावे मिनिट) पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करून संघाला आघाडी मिळवून दिली.
मध्य रेल्वे पुणेने सात खेळाडूंसह खेळणाऱ्या किड्स इलेव्हनचा १०-० असा पराभव करीत एकतर्फी विजयाची नोंद केली. रुबेन केदारी (१७ वे, २२ वे, ३७ वे) याने तीन, भूषण ढेरे (दुसरे,आठवे ) आणि अवधूत सोलनकर (सातवे, ३३वे) आणि विशाल पिल्ले (४७ वे, ५५वे) यांनी प्रत्येकी दोन गोल केले आणि विनोद निंभोरे (१९वे) यांनी गोल केले.
साखळी क गटामध्ये क्रीडा प्रबोधिनीने फ्रेंड्स युनियनचा १०-१ असा धुव्वा उडविला. विजय संघाकडून प्रज्वल मोहरकर (८वे, ९वे, ३७वे, ४८वे) याने चार गोल केले. गोल करणाऱ्यांमध्ये राहुल शिंदे (२१वे, ३३वे), धैर्यशील जाधव (3रे), योगेश बोरकर (१३वे), रोहन पाटील (43वे) आणि सचिन राजगडे (५६वे) आहेत. फ्रेंड युनियनकडून रेहान शेख (२५वे) याने एकमेव गोल नोंदविला,
निकाल
एसआरपीएफ, पुणे वि.वि रोव्हर्स अकादमीकडून पुढे चाल
पीसीएमसी हॉकी अकादमी: ३ (सौरभ पाटील ३५वे – ; जय काळे ३८वे , अभिषेक माने ५७वे) विजयीविरुद्ध एक्सलन्सी हॉकी अकादमी: १ (नवज्योत सिंग ६वे )
मध्य रेल्वे पुणे: १० (भूषण ढेरे २रे, ८वे; अवधुत सोलनकर ७वे, ३३वे; रूबेन केदारी १७वे, २२वे, ३७वे; विनोद निंभोरे १९वे; विशाल पिल्ले ४७वे, ५५वे)
क्रीडा प्रबोधिनी: १० (धैर्यशील जाधव ३रे; प्रज्वल मोहरकर ८वे, ९वे, ३७वे, ४८वे; योगेश बोरकर १३वे; राहुल शिंदे २१वे, ३३वे; रोहन पाटील ४३वे ; सचिन राजगडे ५६वे) वि. वि फ्रेंड्स युनियन (रेहान शेख दि. २५वे).
पूना हॉकी अकादमी वि.वि. एफसीआयकडून पुढे चाल
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआय सुरू करणार आयपीएलसारखी दुसरी लीग, पहा नक्की कसा असेल हा नवा फॉर्मेट
BREAKING! रोहित पर्वाचा शेवट, हार्दिक पंड्या बनला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार