---Advertisement---

दीपक चाहरच्या दमदार कामगिरीनंतर बहीण मालतीने केकेआरबद्दल केली अशी काही कमेंट की प्रतिक्रियांचा पडला पाऊस

On: गुरूवार, एप्रिल 22, 2021 6:56 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेच्या १५ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने-सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात देखील दीपक चाहरने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा सामना सुरू असताना दीपक चाहरची बहीण मालती चाहरने कोलकाता नाईट रायडर्स संघाबद्दल एक ट्विट केले होते. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२० धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर २२१ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मुख्य फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. दीपक चाहरने या सामन्यात देखील ४ गडी बाद केले. आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याने दुसऱ्यांदा ४ गडी बाद करण्याचा कारनामा केला. त्याने कोलकाता संघाचे सलामी फलंदाज नितीश राणा आणि शुबमन गिल यांना माघारी धाडले होते. तसेच सुनील नरेन आणि कर्णधार ओएन मॉर्गनला देखील बाद केले होते.

हा सामना सुरू असताना दीपक चाहरची बहीण मालती चाहर एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की,” भाऊ कोलकाताची घेत आहे…..विकेट”. हे ट्विट पाहून चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रीया दिल्या आहेत.

यावर एका युजरने लिहिले होते की, “नशीब विकेटच घेत होता. ” त्यांनतर दुसऱ्या युजरने लिहिले होते की, “काही वेळासाठी तर मी आश्चर्यचकित झालो होतो.” तसेच एकाने लिहिले की, “रसल आणि कमिन्स घेत होते तेव्हा कुठे होतीस.” मालतीचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.

 

चेन्नईने मिळवला विजय 

सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या ६४ आणि फाफ डू प्लेसिसच्या नाबाद ९५ धावांच्या जोरावर चेन्नईने २० षटकात २२० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, दीपक चाहरने पहिल्या ५ षटकात ४ बळी मिळवून केकेआरची अवस्था पाच बाद ३१ अशी केली होती. मात्र, त्यानंतर आंद्रे रसेलने २२ चेंडूत ५४ आणि पॅट कमिन्सने ३४ चेंडूत नाबाद ६६ धावा बनवून सामना रंगतदार बनविला. मात्र, तो संघाला विजयी करू शकला नाही. चेन्नईने कोलकाताला १९.१ षटकात २०२ धावांवर सर्वबाद करत १८ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या –

टी नटराजनच्या दुखापतीबद्दल हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

RCB vs RR : आरसीबीसाठी ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

केकेआरविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी धोनीने गोलंदाजांना दिला होता ‘हा’ कानमंत्र, स्वतः केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---