इंडियन प्रीमियर लीग २०२१ (Indian premier league 2021) स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये पार पडला होता. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या वेंकटेश अय्यरने (Venkatesh iyer) आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानंतर सैय्यद मुश्ताक अली (Syed mushtaq Ali trophy) आणि विजय हजारे ट्रॉफी (vijay hazare trophy) स्पर्धेत देखील त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले होते. परंतु निराशाजनक कामगिरीमुळे त्याला वनडे संघातून बाहेर जावे लागले आहे. त्याच्या या कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटूने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान मिळवलेल्या वेंकटेश अय्यरला आतापर्यंत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्याला श्रीलंका दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या वनडे मालिकेत देखील तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. हेच कारण आहे की, वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आली नाहीये. मात्र टी२० मालिकेसाठी त्याला संधी देण्यात आली आहे.
तसेच वेंकटेश अय्यरच्या फ्लॉप शो नंतर माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल (madan lal) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते, वेंकटेश अय्यर फार काळ भारतीय संघात टिकू शकणार नाही. त्यांनी आज तक चॅनेलवर चर्चा करताना म्हटले की, “जर तो ५ व्या किंवा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करत असेल तर मला नाही वाटत तो यशस्वी होईल.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “मी त्याची गोलंदाजी देखील पाहिली आहे, ती इतकी खास नव्हती. माझ्या मते, तो दोन ते तीन षटक गोलंदाजी करू शकतो. त्याने आपल्या गोलंदाजीवर खूप कमी मेहनत घेतली आहे. अशातच तुम्ही जर म्हणत असाल की, तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान मिळवेल, तर हे खूप कठीण आहे. एकच स्थान त्याच्यासाठी योग्य आहे, ते म्हणजे डावाची सुरुवात करणे.”
वेंकटेश अय्यरला अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला वनडे मालिकेत एकही षटक गोलंदाजी दिली गेली नव्हती. तसेच फलंदाजीमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यावर देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते.
महत्वाच्या बातम्या :
मोठ्या मनाचा कर्णधार! विजयाचे श्रेय दिले अन्य खेळाडूंना
आयसीसी स्पिरीट ऑफ द क्रिकेट पुरस्कारावर पुन्हा न्यूझीलंडच्या ‘जेंटलमन’ची मोहोर
हार्दिक सोबतच्या स्पर्धेबाबत बोलताना ‘लॉर्ड’ शार्दुल म्हणतोय…