श्रेयस अय्यर हा भारताच्या टी२० संघाचा प्रमुख भाग आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर भारतासाठी अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अय्यरची बॅट शांत राहिली असली तरी, त्याने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. आफ्रिकेपूर्वीच्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत अय्यरने तिन्ही सामन्यांत नाबाद राहताना ५७, ७४ आणि ७३ धावा केल्या होत्या. त्यामुळे एका खराब प्रदर्शनामुळे त्याच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही.
असे असले तरीही भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू मदन लाल यांनी श्रेयस अय्यरच्या सर्वात मोठ्या कमकुवतपणाबद्दल सांगितले. श्रेयस शॉर्ट पिच गोलंदाजीवर संघर्ष करताना दिसला आहे. मदन लाल म्हणतात की, “श्रेयसने या कमकुवतपणावर काम केले नाही तर ऑस्ट्रेलियातील गोलंदाज त्याला सोडणार नाहीत आणि या कारणाने विश्वचषकात भारताला पराभवाला सामोरे जावे लागू शकते.”
एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मदन लाल म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुमच्यात काही कमकुवतपणा असेल, तर विरोधी गोलंदाज त्याला नक्कीच लक्ष्य करतील. हे होणार नाही हे विसरून जा. आता त्याला (श्रेयस अय्यर) यातून मार्ग काढावा लागेल. त्याने १०० धावा केल्या तर नक्कीच टाळ्या वाजवेल पण ते त्याला सोडणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कोणताही संघ विरोधी पक्षावर बारीक नजर ठेवतो. अशातच एखाद्या फलंदाजाच्या नाजूक जागेवर बोट ठेवण्यास गोलंदाजी कुठेही कमी पडणार नाहीत.”
दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेत श्रेयस अय्यर शॉर्ट बॉलवर संघर्ष करताना दिसला. शिवाय आगामी विश्वचषक ऑस्ट्रेलिया मध्ये आयेजित करण्यात आला आहे. ज्याठिकाणी प्रत्येक बॉलवर गोलंदजांना अधिकचा बाऊंस नेहमीच मिळत असते. त्यामुळए विश्वचषकात अय्यर संघर्ष करेल हे जवळपास निश्चित आहे.
दरम्यान, २०२२ मध्ये, अय्यर ऑस्ट्रेलियात शॉर्ट बॉल विरुद्ध संघर्ष करताना दिसला. त्यावेळी त्याने ५ सामन्यात फलंदाजी करताना ०, १२ नाबाद, २, ३८ आणि १९ धावा केल्या. आयपीएल २०२२ मध्येही अय्यर शॉर्ट बॉलिंगसमोर नाराज दिसला होता. अय्यर १२ डावांमध्ये वेगवान गोलंदाजांसमोर ५ वेळा बाद झाला, ज्यामध्ये त्याने ३ वेळा शॉर्ट पिच बॉलवर आपली विकेट गमावली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO । १७ वर्षीय गोलंदाजाची फिरकी पाहून तुम्हीही म्हणाल ‘एकदम कडक!’
‘इशान किशनला खेळात आणखी सुधारणा करता येतील’, भारतीय दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला
कार्तिक टी२० विश्वचषक खेळणार?, प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे संकेत