रणजी ट्रॉफी क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेश संघाने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात बंगालला १७४ धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे. खास बाब अशी की, मध्यप्रदेश संघाने तब्बल २३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. रणजी संघाने १९९९मध्ये कर्नाटक संघाविरुद्ध अंतिम सामना खेळला होता. मुंबई आणि उत्तरप्रदेश संघात सुरू पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील मुंबईने विजय मिळवला. अशात मुंबई संघाशी मध्यप्रदेश संघ अंतिम सामना खेळेल.
उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना मध्यप्रदेश (Madhya Pradesh) संघाने हिमांशू मंत्रीच्या १६५ धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्व गड्यांच्या मोबदल्यात ३४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगालचा संघ मनोज तिवारी (Manoj Tiwari) आणि शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) यांच्या शतकी खेळीनंतरही केवळ २७३ धावांवर गारद झाला. पहिल्या डावाच्या जोरावर मध्य प्रदेशने ६८ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मध्य प्रदेशचा संघ २८१ धावांत गारद झाला. मध्य प्रदेशने बंगालसमोर विजयासाठी ३५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, बंगालचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १७५ धावांत संपुष्टात आला.
A fine all-round bowling display from Madhya Pradesh helped them complete a 174-run win over Bengal on Day 5 of the @Paytm #RanjiTrophy #SF1 & secure a place in the #Final. 👏 👏 #BENvMP
Watch the highlights 🎥 🔽https://t.co/R9isgIJcDQ pic.twitter.com/7R3192utoV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 18, 2022
बंगाल (Bengal) संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली आणि पहिल्याच चेंडूवर सलामीवीर अभिषेक रमणला कार्तिकेयने पॅव्हेलियनमध्ये धाडले. सुदीप कुमार घारामी आणि अभिमन्यू इसवरन यांनी ४९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी जी सर्शन जैनने मोडली. मागील सामन्यातील शतकवीर घारामी ३२ चेंडूत १९ धावा करून बाद झाला.
Madhya Pradesh march into the @Paytm #RanjiTrophy #Final! 👏 👏
The Aditya Shrivastava-led unit beat Bengal by 174 runs in the #SF1 to seal a spot in the summit clash. 👍 👍 #BENvMP
Scorecard ▶️ https://t.co/liCIcmzaPM pic.twitter.com/qoYkqNHkQh
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 18, 2022
अभिषेक पोरेल आणि मनोज तिवारी यांनी प्रत्येकी ७ धावा करत कार्तिकेयच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. उपांत्यपूर्व सामन्यात बंगालच्या ९ फलंदाजांनी अर्धशतक झळकावत नवीन विक्रम आपल्या नावावर केले होते. मात्र, मध्यप्रदेशच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीसमोर बंगालची सलामी फळी टिकू शकली नाही. अभिमन्यू ईश्वरन याने दुसऱ्या डावात सर्वाधिक ७८ धावा केल्या. बंगाल संघ आपल्या चौथ्या दिवशी ९६ धावांवर ४ विकेट्स गमावत फलंदाजीला उतरला. पुढे त्यांनी शेवटच्या दिवशी फक्त ७९ धावा करत ६ विकेट्स गमावल्या.
मुंबई संघही अंतिम सामन्यात दाखल
मुंबई संघाने ४७व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा दरवाजा ठोठावला आहे. संघाने उपांत्य सामन्यात उत्तरप्रदेशवर पहिल्या डावात आघाडी घेत विजय मिळवला. सामन्याच्या पाचव्या षटकात आणि शेवटच्या दिवशी शनिवारी (दि. १८ जून) ओल्या मैदानामुळे पहिल्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही. ज्यावेळी दोन्ही संघ सामना अनिर्णित करण्यावर सहमत झाले, तेव्हा मुंबईने आपला दुसरा डाव ४ विकेट्स गमावत ५५३ धावांवर घोषित केला. त्यांनी पहिल्या डावात ३९३, तर उत्तरप्रदेश संघाने पहिल्या डावात १८० धावा केल्या होत्या. सामनावीर यशस्वी जयसवालने पहिल्या डावात १०० आणि दुसऱ्या डावात १८१ धावा चोपल्या. मुंबई संघाला आता २२ जूनपासून बंगळुरू येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात मध्यप्रदेश संघाचा सामना करावा लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अब खेलने का नहीं *** का टाईम है’, दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून वीरूही झाला फॅन
नाद नाद नादच! सर्वात मोठी धावसंख्या, सर्वाधिक षटकार, नेदरलँडविरुद्ध इंग्लंडने रचले अर्धा डझन विक्रम