महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याचा सुपुत्र अविनाश साबळे रविवारी (दि. 16 जुलै) सिलेसिया डायमंड लीग मीट स्पर्धेत चमकला. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत कारकीर्दीतील दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन करत सहावे स्थान पटकावले. यासह स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरला. तो या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला ट्रॅक अँड फील्ड ऍथलिट बनला आहे.
राष्ट्रीय विजेत्या अविनाश साबळे (Avinash Sable) याने सिलेसिया डायमंड लीग 2023 (Silesia Diamond League 2023) स्पर्धेत 8 मिनिटे 11:63 सेकंदाची वेळ नोंदवली. विशेष म्हणजे, त्याचा राष्ट्रीय विक्रमाची वेळ ही 8:11:20 होती. मात्र, त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) स्पर्धेत पात्र ठरण्यासाठीचा मार्क 8:15:00 होता, जो त्याने मोडला.
Avinash you beauty ????
✨ Avinash Sable has qualified for Paris Olympics ✨
➡️ He clocked 8:11.63 to finish 6th in 3000m SC at prestigious Silesia Diamond League.
(Paris Olympics Qualification mark: 8:15.00)
➡️ He also narrowly missed his PB: 8:11.20 @afiindia #SilesiaDL pic.twitter.com/gMMxPz6JUb— India_AllSports (@India_AllSports) July 16, 2023
ॲथलेटिक्समधील वर्ल्डकप म्हटल्या जाणाऱ्या, डायमंड लीगमध्ये पाचव्या स्थानी राहूनही तब्बल नवव्यांदा स्वतःचाच स्टीपलचेसमधील राष्ट्रीय विक्रम अविनाशने मोडला होता. हा नवीन विक्रम आता 8 मिनिटे 12:48 सेकंद झाला. अशात अविनाश ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यामुळे चोहो बाजूंनी त्याच्यावर अभिनंदन आणि कौतुकांचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत रचला होता इतिहास
भारताचा स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने बर्मिंघम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला होता. त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिले होते. साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत साबळेने 8:11:20 अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. मागील सहा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिन्ही पदके ही केवळ केनियन खेळाडू जिंकत होते. मात्र, अविनाशने हे रौप्य पदक जिंकत त्यांच्या वर्चस्वाला धक्का दिला होता.
अविनाशविषयी थोडक्यात
अविनाश हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या मांडवा गावचा रहिवासी आहे. लहानपणी अत्यंत कष्टातून त्याने धावण्याचे प्रशिक्षण घेतले. सैन्यात भरती झाल्यानंतर तो भारतासाठी अनेक स्पर्धांमध्ये चमकला. मागील वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तो अगदी थोड्या फरकाने अंतिम फेरीसाठी पात्र होण्यापासून राहिला होता. मात्र, त्यावेळी ते अपयश त्याने आता भरून काढले आहे. आता भारताला त्याच्याकडून ऑलिम्पिकमध्ये अपेक्षा असतील. (maharashtra beed vilage track and field athlete avinash sable qualifies for paris olympics 2024 read here)
महत्वाच्या बातम्या-
‘मी पुढील 10-12 वर्षे कार्लोसचं…’, 20व्या वर्षी विम्बल्डनचा किताब जिंकणाऱ्या अल्कारेझचा फॅन बनला सचिन
BREAKING: अल्कारेझ बनला नवा विंबल्डन सम्राट! जोकोविचचे राज्य खालसा





