टेनिस विश्वातील तिसरी ग्रँडस्लॅम म्हणजेच विंबल्डन स्पर्धा लंडन येथे खेळली गेली .रविवारी (16 जुलै) स्पर्धेचा पुरुष एकेरीचा अंतिम सामना खेळला गेला. अग्रमानांकित स्पेनचा कार्लोस अल्कारेझ विरुद्ध सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांच्या दरम्यान हा सामना झाला. ज्यामध्ये अल्कारेझ याने जोकोविच याला 1-6, 7-6, 6-1, 3-6, 6-4 असे पराभूत करत कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले.
क्रमवारीतील पहिल्या दोन क्रमांकावरील या खेळाडूंमध्ये दमदार सामन्याची अपेक्षा सर्वांनी केली होती. मात्र, जोकोविचने अगदी एकतर्फी पहिला सेट जिंकत आपल्या 24 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाकडे आगेकूच सुरू केली. त्याने पहिला सेट 6-1 असा त्यांना वेळ केला. अल्कारेझने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत टायब्रेकरपर्यंत ताणल्या गेलेल्या सेटमध्ये 7-6 असा विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अल्कारेझने 6-1 अशी सरशी सादर आघाडी मिळवली. मात्र, जोकोविचने आपल्या अनुभवाचा फायदा घेत चौथ्या सेटमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत 6-3 अशाप्रकारे सेट आपल्या नावे केला.
निर्णायक सेटमध्ये जोकोविचने पहिला गेम जिंकून दमदार सुरुवात केली. त्यानंतर मात्र अल्कारेझने सलग तीन गेम आपल्या नावे केले. जवळपास साडेचार तासांपेक्षा जास्त लांबलेल्या या सामन्यात जोकोविच हा अल्कारेझच्या ऊर्जेसमोर काहीसा ढिला पडला. याचाच फायदा घेत त्याने आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली.
(Wimbledon 2023 Men’s Singles Carlos Alcaraz Beat Novak Djokovic)
महत्वाच्या बातम्या –
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ च्या रोमांचक सामन्यांचा आनंद घेतला
बेअरस्टोच्या विवादित स्टंपिंगवर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, ‘मी आधीही असं…’