सिन्नर-नाशिक येथे ३१ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या ६६ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पहिले दिवस झालेल्या साखळी सामन्यानंतर आजपासून बादफेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.
काल झालेल्या महिला विभागाच्या साखळी सामन्यात मुंबई उपनगरने अहमदनगरचा ५३-२१ असा पराभव करत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. चढाईत कोमल देवकरने चांगला खेळ केला. तर कव्हरमध्ये कर्णधार राणी उपहार व कॉर्नरला सायली जाधवने उत्कृष्ट पकडी केल्या. पुणे विरुद्ध सातारा यांच्यात झालेल्या सामन्यात पुणेने ६२-२२ अशी बाजी मारत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायली करिपले व दिपीका जोशप यांनी आक्रमक खेळ केला.
रत्नागिरी व कोल्हापूर महिला संघाने आपल्याला गटात विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच ठाणे, रायगड, सातारा, मुंबई शहर, सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, अहमदनगर या संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
पुरुष विभागात धुळे ने पालघरचा २६-२१ असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. अहमदनगर विरुद्ध जळगाव यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत अहमदनगर १ गुणांनी बाजी मारत बाद फेरीत प्रवेश मिळवला. पुणे, रायगड,सांगली, कोल्हापूर संघाने आपल्याला गटात सर्व सामने जिंकून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
मुंबई शहर ‘फ’ गटात चार सामने जिंकत बाद फेरी गाठली. मुंबई शहर कडून अजिंक्य कापरे, सुशांत साईल, ओमकार जाधव यांनी चांगला खेळ केला. नाशिक ने मुंबई उपनगरचा धक्कादायक पराभव केला.
स्पर्धेची खरी चुरस आज पासून आहे. आज बादफेरीचे सामने होणार आहेत. महिला विभागाचे व पुरुष विभागाचे बादफेरीचे सामने पुढील प्रमाणे
बादफेरीचे सामने महिला विभाग
उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने:
१) सिंधुदुर्ग विरुद्ध मुंबई शहर
२) सातारा विरुद्ध पालघर
३) रायगड विरुद्ध ठाणे
४) अहमदनगर विरुद्ध नाशिक
उपांत्यपूर्व फेरीचे सामने:
१) मुंबई उनगर विरुध्द उपउपांत्यपूर्व १ विजयी
२) कोल्हापूर विरुद्ध उपउपांत्यपूर्व २ विजयी
३) पुणे विरुद्ध उपउपांत्यपूर्व ३ विजयी
४) रत्नागिरी विरुद्ध उपउपांत्यपूर्व ४ विजयी
बादफेरीचे सामने पुरुष विभाग-
उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने:
१) अहमदनगर विरुद्ध रत्नागिरी
२) धुळे विरुद्ध नंदुरबार
३) ठाणे विरुद्ध मुंबई शहर
४) बीड विरुद्ध मुंबई उपनगर
उपांत्यपूर्व फेरीचे सामने:
१) पुणे विरुद्ध उपउपांत्यपूर्व १ विजयी
२) रायगड विरुद्ध उपउपांत्यपूर्व २ विजयी
३) कोल्हापूर विरुध्द उपउपांत्यपूर्व ३ विजयी
४) सांगली विरुद्ध उपउपांत्यपूर्व ४ विजयी