महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंची निवड चाचणी १८ व १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीयम (मंगळवार पेठ) येथे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी दिली.
ही निवड चाचणी गादी आणि माती या दोन्ही विभागात होणार आहे. दोन्ही विभागात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो व महाराष्ट्र केसरी गट ८६ किलो ते १२५ किलो वजनी गटांमध्ये ही निवड चाचणी होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते दु. १२ या वेळेत खेळाडूंची वजने घेतली जाणार आहेत.
या निवड चाचणीमध्ये केवळ पुणे शहरातील खेळाडूंचा असणे तसेच तालीम संघाचा नोंदणीकृत खेळाडू असणे बंधनकारक असणार आहे. खेळाडूंनी आधारकार्डची मूळ प्रत व दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच सर्व खेळाडूंना कोरोना विषयीच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी खेळाडूंनी राष्ट्रीय तालीम संघ, मंगळवारपेठ येथे किंवा अविनाश टकले, योगेश पवार, गणेश दांगट, सागर भोंडवे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–बाबांनो आता तरी फिटनेसवर लक्ष द्या, इंग्लंडला धावांचा डोंगर उभारु देणाऱ्या भारतीय गोलंदाजांना माजी खेळाडूचा मोलाचा सल्ला
–टी नटराजन या महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर, बीसीसीआयने घेतला महत्त्वाचा निर्णय
–जेव्हा इशांतचे लांब केस कापणार होता सेहवाग, लहान मुलांप्रमाणे रडला, भारतीय दिग्गजाने सांगितला मजेदार किस्सा
–टीम इंडियाच्या विश्वविजयावर आधारित या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख ठरली, या दिवशी होणार रिलीज