मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पार पडणार आहे. या लिलावात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे तब्बल 319 क्रिकेटपटू आपले नशीब आजमावतील. मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून फॅनकोड या लाईव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर या लिलावाचे प्रक्षेपण होईल.
शनिवारी (3 जून) झालेल्या फ्रॅंचाईजी लिलावात संघमालकांनी तब्बल 57 कोटी रुपयांची रक्कम देत सहा संघ खरेदी केले. यामध्ये पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी व सोलापूर यांचा समावेश आहे. त्यानंतर आता हे सहा संघ खेळाडूंवर बोली लावतील.
या लिलावासाठी 291 वरिष्ठ व 28 अंडर 19 खेळाडूंची नाव नोंदणी झाली आहे. प्रत्येक संघात कमीत कमी 16 खेळाडू असणे आवश्यक असेल. यापूर्वीच प्रत्येक संघाला एक आयकॉन खेळाडू दिला गेल्याने, या लिलावात कमीत कमी 90 खेळाडूंवर बोली लागू शकते. प्रत्येक संघात दोन 19 वर्षाखालील खेळाडू असणे बंधनकारक आहे.
प्रत्येक संघ या लिलावात खेळाडूंवर 20 लाख इतका खर्च करू शकतो. यामध्ये खेळाडूंची वर्गवारी ए, बी व सी अशा तीन गटांमध्ये केली असून, त्यांची आधारभूत किंमत अनुक्रमे 60 हजार, 40 हजार व 20 हजार इतकी असणार आहे.
या लिलावात शमशुझमा काझी, नौशाद शेख, प्रशांत सोलंकी, दिव्यांग हिंगणेकर व अर्शिन कुलकर्णी या खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. ही स्पर्धा 15 जूनपासून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल.
(Maharashtra Premier League MPL Players Auction Live Updates)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वॉर्नरच्या ताकदीची द्रविडलाही जाणीव; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वी म्हणाला, ‘त्याला आऊट करणे…’
भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा स्मिथ WTC फायनलपूर्वी चिंतेत; म्हणाला, ‘होय, मला टेन्शन…’